Aam Papad Recipe: Sakal
फूड

Aam Papad Recipe: उन्हाळ्यात ट्राय करा गोड आणि आंबट आंब्याचा पापड, जाणून घ्या रेसिपी

Mango Papad Recipe: जर तुम्हाला आंबा खायला आवडत असेल तर आंब्यापासून गोड आणि आंबट पापड बनवू शकता. यंदा बाजारातून खरेदी करण्याएवजी घरीच बनवा आणि आस्वाद घ्या .

Puja Bonkile

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बाजारात आंबा विक्रीसाठी येतो. आंब्यापासून फक्त चटणी,लोणचं बनवले जात नाही तर चवदार पापड देखील बनवले जातात. आंब्याचे पापड बघून असे वाटते की ते बनवणे खूप अवघड आहे पण तसे नाही. आंब्याचे पापड घरी सहज बनवता येतात. चला तर मग जाणून घेऊया आंब्याचे पापड झटपट कसे बनवावे.

आंब्याचा पापड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

आंब्याचा गर

साखर

मीठ

लिंबाचा रस

पाणी

आंब्याचा पापड बनवण्याची कृती

आंब्याचा पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आंबे पाण्यात भिजत ठेवावे. नंतर ते सोलून त्यांचे लहान तुकडे करावे.

आंब्याचे तुकडे केल्यावर मिक्सरमध्ये टाकून त्याचा जाडसर रस तयार करा.

आता एका कढईत अर्धा कप पाणी घाला आणि त्यात आंब्याचा रस घाला आणि मंद आचेवर शिजवा.

सुमारे 10 मिनिटे शिजवल्यानंतर गॅसची स्पीड कमी करा. नंतर त्यात 3 टेबलस्पून साखर, चिमूटभर मीठ, 4 ते 5 थेंब लिंबाचा रस घालून शिजवा.

मिश्रण घट्ट झाल्यावर ताबडतोब पसरट ताटामध्ये काढून पसरवा. ताटाला आधी तूप लावावे.

नंतर ताट कापडाने झाकून उन्हात ठेवा आणि कोरडे राहू द्या. आंब्याच्या पापडाचे तुकडे करून त्यात काळे मीठ टाकून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT