Mango Ice Cubes: Sakal
फूड

Mango Ice Cubes: झटपट तयार होईल कैरीचे सरबत; आधीच 'असे' तयार करून ठेवा 'मँगो आईस क्युब'

Mango Ice Cubes: तुम्ही घरीच 'मँगो आईस क्युब' बनवून कैरी सरबतचा आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

how to make mango ice cubes for instant mango sharbat try at home in summer

उन्हाळ्याच्या दिवसात आंबा, कैरी बाजारात दिसायला सुरूवात झाली आहे. कैरीपासून पन्हं, लोणचं, तक्कू यासारखे अनेक पदार्थ बनवले जातात. कैरीचे थंडगार सरबत चवीसह आरोग्यदायी देखील आहे. उन्हाळ्यात थंडगार पेय पिण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात बाहेरचे आईस्क्रीम, सरबत यासारखे पदार्थ खाण्यापेक्षा घरीच झटपट कैरीचे आईस क्युब बनवून सरबत तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कैरीचे आईस क्युब कसे बनवावे.

  • मँगो आईस क्युब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बारिक चिरलेली कैरी- १/२ कप

पुदिन्याची पानं - १/ ४

खडी साखर - १ टीस्पून

आल्याचे बारिक तुकडे

भाजलेले जिरं पावडर- १ टीस्पून

काळं मीठ- १/२ टीस्पून

लिंबाचा रस - १/२ टीस्पून

सब्जा बिया - २ चमचे

बर्फाचे तुकडे - ४

पाणी गरजेनुसार

  • सरबत बनवण्याची कृती

कैरीचे सरबत बनवण्यासाठी सर्वात आधी कैरी स्वच्छ धुवून घ्या.

नंतर कैरीचे बारिक तुकडे करा.

यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात कैरीचे बारिक तुकडे, पुदिन्याचे पानं, खडीसाखर, जिरं पावडर, काळं मिठ, लिंबाचा रस, बर्फाचे तुकडे आणि आल्याचा एक छोटा तुकडा टाकून बारिक पेस्ट तयार करा.

तयार पेस्ट आईस स्ट्रेमध्ये टाका आणि त्यावर पुदिन्याचे पानं ठेवा. नंतर हा ट्रे फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

नंतर तयार झालेले मँगो आईस क्युब एका ग्लासमध्ये टाका आणि त्यात सब्जा मिक्स करून थोडे पाणी टाका. हे चांगले मिक्स करा.

कैरीचे सरबत सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT