Mango Pedha Sakal
फूड

Mango Recipe : आंब्याचा फक्त रसच नव्हे तर मँगो पेढाही घरच्या घरी बनवा!

हा पेढा खाऊन फक्त बच्चेकंपनीच नव्हे तर घरातला प्रत्येकजण खूश होईल.

वैष्णवी कारंजकर

उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन. आंबा म्हटलं की आमरस, आंबा पोळी, आंबा बर्फी हे आलंच. हे सगळं तुम्ही घरी बनवलं असेल, पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही आंबा पेढाही घरी बनवू शकता. कसं? जाणून घ्या सोपी रेसिपी.

साहित्य

  1. तीन ते चार कप मँगो प्युरी

  2. तीन ते चार कप मिल्क पावडर

  3. १० ते १२ बदाम

  4. ३ चमचे तूप

  5. पाव कप साखर

  6. वेलची पूड

  7. पिस्ता

  8. चांदीचा वर्ख

  9. फूड कलर थोडासा

  10. चिमूटभर केसर

  11. तीन ते चार कप कन्डेन्स्ड मिल्क

कृती

  • तूप एका भांड्यामध्ये गरम करून घ्या.

  • त्यानंतर कन्डेन्स्ड मिल्क व मिल्क पावडर टाका आणि घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या.

  • तयार झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या.

  • दुसऱ्या एका भांड्यामध्ये तूप गरम करून घ्या.

  • त्यामध्ये मँगो प्युरी, केसर, वेलची पूड टाका आणि पुन्हा गरम करा.

  • जेव्हा व्यवस्थित शिजेल तेव्हा त्यात कन्डेन्स मिल्क, मिल्क पावडरचं मिश्रण टाका.

  • हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. घट्ट झाल्यावर एका ताटात काढून घ्या.

  • हे मिश्रण थंड झाल्यावर नीट पेढ्याच्या आकारात वळून घ्या.

  • पेढ्यांच्या सजावटीसाठी केशर, पिस्ता, चांदीचा वर्ख वापरा.

  • त्यानंतर हे पेढे फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर तुम्ही हे खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT