Healthy Breakfast Recipe  esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा हेल्दी आणि टेस्टी मसाला ओट्स, एकदम सोपी आहे रेसिपी

मसाला ओट्स बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची गरज भासणार नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा नाश्ता हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाला ओट्स होयं. ही एक अशी डीश आहे, जी खाल्ल्यामुळे तुमचे शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी मदत होते.

सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज पोहे, उपीट आणि इडली खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर हे मसाला ओट्स नक्की करून बघा. मसाला ओट्स बनवण्यासाठी तुम्हाला फार काही साहित्य लागणार नाही.

अगदी घरातील मोजक्या साहित्यापासून आणि ओट्सपासून ही डिश झटपट बनवली जाते. शिवाय, हे मसाला ओट्स करण्यासाठी फार कमी वेळ लागतो. चला तर मग आज आपण मसाला ओट्सची टेस्टी आणि हेल्दी रेसिपी जाणून घेऊयात.

मसाला ओट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • १ कप ओट्स

  • १ टोमॅटो बारीक चिरलेला

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • १ चमचा लाल तिखट

  • १ चमचा हळद

  • १ चमचा गरम मसाला

  • चवीनुसार मीठ

मसाला ओट्स बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • मसाला ओट्स बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये ओट्स घालून ते परतून घ्या.

  • हलका सोनेरी कलर येईपर्यंत ओट्स भाजून घ्या.

  • त्यानंतर, एका कढईमध्ये तूप घालून ती गॅसवर ठेवा.

  • तूप गरम झाले की, त्यात जिरे आणि आले-लसणाची पेस्ट घालून चांगलं परतून घ्या.

  • त्यानंतर, बारीक चिरलेला कांदा घाला.

  • कांदा परतला की त्यात मिरची, टोमॅटो आणि मसाले, मीठ घालून चांगले परतून घ्या.

  • आता या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि नंतर भाजलेले ओट्स घाला.

  • आता तुमचे मसाला ओट्स चांगले १५-२० मिनिटे शिजू द्या.

  • त्यानंतर, गरमागरम मसाला ओट्स सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT