Mix Dal Dosa Recipe esakal
फूड

Mix Dal Dosa Recipe : नाश्त्याला बनवा स्वादिष्ट मिक्स डाळींचा डोसा, चवदारही लागणार अन् पोट ही भरणार, वाचा सोपी रेसिपी

Mix Dal Dosa Recipe : तुम्ही कधी मिश्र डाळींचा डोसा खाल्ला आहे का? जर नसेल खाल्ला तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Mix Dal Dosa Recipe : डोसा हा दाक्षिणात्य पदार्थ असून तो खायला सगळ्यांनाच आवडतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये हा पदार्थ खायला आवडतो. चवीला परिपूर्ण आणि हेल्दी असणारा हा डोसा तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवला जातो. अशा प्रकारचा डोसा तुम्ही नेहमीच खाल्ला असेल.

परंतु, तुम्ही कधी मिश्र डाळींचा डोसा खाल्ला आहे का? जर नसेल खाल्ला तर आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. हा मिक्स डाळींचा डोसा पौष्टिक तर असतोच शिवाय चवीला ही हा डोसा उत्तम लागतो. या प्रकारच्या डोसामध्ये उडीद डाळ व्यतिरिक्त हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ आणि तांदूळ यांचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात मिक्स डाळींच्या या डोसाची सोपी रेसिपी.

मिक्स डाळींचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप तांदूळ

  • अर्धा कप उडीद डाळ

  • अर्धा कप हिरवे मूग

  • अर्धा कप तूर डाळ

  • अर्धा कप मूग डाळ

  • अर्धा कप हरभरा डाळ

  • अर्धा चमचा आलं

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार तेल

मिक्स डाळींचा डोसा बनवण्याची सोपी पद्धत

  • मिक्स डाळींचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी सर्व डाळी एकत्र करून एका मोठ्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवा.

  • त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सर्व डाळी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या. या डाळी बारीक करताना त्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि मीठ घालायला विसरू नका.

  • आता तुमचे मिक्स डाळींचे डोसाचे बॅटर तयार आहे.

  • दुसऱ्या बाजूला गॅसवर पॅन किंवा डोसा तवा ठेऊन त्याला तेल लावून घ्या.

  • तवा गरम झाल्यावर त्यात डोसाचे पीठ गोलाकार पसरवा.

  • डोसा एका बाजूने चांगला भाजल्यावर दुसऱ्या बाजूने तेल लावून सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्यावा.

  • तुमचा गरमागरम मिक्स डाळींचा डोसा तयार आहे.

  • नारळाच्या चटणीसोबत हा गरमागरम डोसा सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Women Doctor : बहिणीसाठी शिक्षण सोडलं, वडिलांसोबत शेती करायचा भाऊ; कर्ज काढून MBBS केलं, एक महिन्यानंतर तिचा...

Laptop Repair Tips: लॅपटॉप खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आजपासूनच 'या' 10 चुका करणे टाळा

Latest Marathi News Live Update : चांदसैली घाटातील सातपायरी वळणार कोसळली दरड

Viral News : कामगाराने केला १.२४ कोटींच्या बांगड्यांचा चुराडा, पण त्यानंतर मालकाने जे केले ते वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Sangli Crime : सांगलीत खळबळ! ‘कृषी’ विभागातील शिपायावर तलवार हल्ला; गळ्याला फास लावला अन्

SCROLL FOR NEXT