Diwali Recipe 2023 esakal
फूड

Diwali Recipe 2023 : यंदाच्या दिवाळीला रव्यापासून बनवा ही स्वादिष्ट मिठाई, जाणून घ्या रेसिपी

दिवाळीमध्ये फराळासोबत विविध प्रकारच्या मिठाईंची नुसती रेलचेल असते.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Recipe 2023 : दिवाळीमध्ये विविध खाद्यपदार्थ, गोडाधोडाचे पदार्थ आणि फराळाची रेलचेल असते. हे सर्व पदार्थ दिवाळीमध्ये आवर्जून बनवले जातात. दरवर्षी नेहमीच्या प्रकारचे पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर यंदा मोहनथाळची रेसिपी नक्की ट्राय करा.

ही मोहनथाळची रेसिपी करायला एकदम सोपी आहे. शिवाय, ही रेसिपी करायला जास्त वेळ ही लागत नाही. ही रेसिपी झटपट होते. यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग जाणून घेऊयात या मोहनथाळच्या रेसिपीबद्दल.

मोहनथाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ कप रवा

  • दूध १ कप

  • पाणी १ कप

  • साखर अर्धा कप

  • तूप

  • बदाम-काजूचे बारीक काप

  • वेलची पावडर १ चमचा

  • केसर चिमूटभर

मोहनथाळ बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी गॅसवर एक पॅन किंवा कढई ठेवा.

  • त्यांनंतर, या पॅनमध्ये दूध आणि साखर घालून हे मिश्रण चांगले ढवळा.

  • आता यामध्ये केशर, वेलची पावडर आणि १ कप पाणी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • एक गोष्ट लक्षात घ्या की, हे मिश्रण तुम्हाला घट्ट करायचे नाही.

  • या मिश्रणातली साखर दूधात चांगल्या प्रकारे मिसळावी यासाठी हे उकळवा.

  • दूधात साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करा.

  • हे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार झाल्यावर आता दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये तूप घालून रवा भाजायाल सुरू करा.

  • रवा सोनेरी होईपर्यंत तो चांगल्या प्रकारे भाजून घ्या.

  • रवा जास्त भाजू नका अन्यथा तो पॅनला चिटकेल.

  • आता भाजलेला रवा एका ताटात काढून घ्या.

  • रवा भाजून झाल्यानंतर, आता दुसऱ्या एका पॅनमध्ये किंवा खोलगट भांड्यात तूप घालून ते गॅसवर गरम करायला ठेवा.

  • आता, या तूपामध्ये बदाम-काजूचे बारीक काप घालून ते तूपात भाजून घ्या.

  • यानंतर, या मिश्रणात भाजलेला रवा घाला. त्यानंतर, हळूहळू त्यात दूधाचे मिश्रण घाला.

  • आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घ्या.

  • हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे शिजेपर्यंत हलवत रहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock : 'या' एका स्टॉकने गुंतवणूकदारांची केली चांदी! तुमची १ लाखाची गुंतवणूक आज झाली असती ६४ लाख रुपये...

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

Video : अर्जुन स्वतःच्या जीवाशी खेळून महिपतला पोलिसांच्या हवाली करणार ! नव्या ट्विस्टने प्रेक्षकही चकित

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

SCROLL FOR NEXT