Moong Dal Paratha esakal
फूड

Moong Dal Paratha : नाश्त्याला बनवा टेस्टी आणि हेल्दी मूग डाळीचा पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

Moong Dal Paratha : जर तुम्हाला दिवसाची सुरूवात ही हेल्दी आणि टेस्टी खाऊन करायची असेल तर, मूग डाळीपासून बनवलेले पराठे हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो.

Monika Lonkar –Kumbhar

Moong Dal Paratha : जर तुम्हाला दिवसाची सुरूवात ही हेल्दी आणि टेस्टी खाऊन करायची असेल तर मूग डाळीपासून बनवलेले पराठे हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. हिवाळ्यात अनेकांना नाश्त्यामध्ये पराठे खायला आवडतात. बर नेहमीचे नाश्त्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.

जर तुम्ही देखील या पदार्थांसोबत बटाट्याचा, कोबीचा किंवा पनीर पराठा खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या खास रेसिपीचे नाव आहे मूग डाळ पराठा. चला तर मग जाणून घेऊयात, या टेस्टी आणि हेल्दी रेसिपीबद्दल.

मूग डाळ पराठा करण्यासाठी लागणारे साहित्य :

  • गव्हाचे पीठ – २ वाट्या

  • मूग डाळ – १ वाटी

  • हळद – अर्धा चमचा

  • धना पावडर – १ चमचा

  • गरम मसाला – अर्धा चमचा

  • हिंग – अर्धा चमचा

  • लाल तिखट – १ चमचा

  • तेल

  • २-३ हिरव्या मिरच्या

  • मीठ चवीनुसार

मूग डाळ पराठा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • चविष्ट मूगडाळ पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी मूग डाळ स्वच्छ धुवा.

  • त्यानंतर, ३-४ तास पाण्यात भिजत ठेवा.

  • त्यानंतर, डाळ पाण्यातून काढून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा. आता ही मूग डाळीची बारीक पेस्ट एका भांड्यात काढून घ्या.

  • आता एका ताटात किंवा परातीमध्ये गव्हाचे पीठ चाळून घ्या. त्यात आता मीठ मिक्स करा आणि थोडे पाणी मिसळून पीठ मळून घ्या.

  • यानंतर, हे गव्हाचे पीठ सेट होण्यासाठी २० मिनिटे झाकून ठेवा.

  • आता एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये २ चमचे तेल घाला. हे तेल गरम झाल्यावर त्यात जिरे व हिंग घालून परतून घ्या.

  • आता या तेलात हळद, धनेपावडर आणि हिरवी मिरची घाला. त्यानंतर, मूग डाळीची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.

  • आता हे मिश्रण मंद आचेवर परतून घ्या. हे मिश्रण चांगले भाजल्यानंतर थोडावेळ थंड करायला ठेवा. तुमचे पराठ्याचे सारण आता तयार आहे.

  • त्यानंतर, गव्हाच्या पीठाचे बारीक गोळे करा आणि त्यात मूग डाळीचे सारण भरून ते हलक्या हाताने लाटून घ्या.

  • दुसऱ्या बाजूला गॅसवर तवा किंवा पॅन गरम करायला ठेवा आणि त्यावर तूप किंवा तेल घालून पराठा दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या.

  • हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत हे गरमागरम पराठे सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT