Murmurre Appe Recipe esakal
फूड

Murmurre Appe Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी आणि हेल्दी मुरमुरे अप्पे, चवीला लागतात भन्नाट, नोट करा सोपी रेसिपी

Murmurre Appe Recipe : नाश्त्याला काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर त्यासाठी मुरमुरे अप्पे हा उत्तम पर्याय आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Murmurre Appe Recipe : सकाळचा नाश्ता हा लाईट आणि हेल्दी असावा, असे सगळ्यांनाच वाटते. परंतु, हा नाश्ता हेल्दी-टेस्टी असण्यासोबतच पचायला ही हलका हवा. असे ही काहींचे म्हणणे असते. नाश्त्याला नेहमीच पोहे, उपमा, इडली आणि शिरा खाण्यापेक्षा काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर त्यासाठी मुरमुरा अप्पे हा उत्तम पर्याय आहे.

आतापर्यंत तुम्ही रव्यापासून बनवलेले अप्पे, डाळी-तांदळापासून बनवलेले अप्पे खाल्ले असतील पण तुम्ही कधी मुरमुरे अप्पे ट्राय केले आहेत का? नाही ना. मग, आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला हे हेल्दी-टेस्टी असणारे मुरमुरे अप्पे कसे बनवायचे? त्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

मुरमुरे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2 कप मुरमुरे

  • १ कप रवा

  • २ कप दही

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ टोमॅटो बारीक चिरलेला

  • ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • १ चमचा लाल तिखट

  • चवीनुसार मीठ

  • १ चमचा सोडा

मुरमुरे अप्पे बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका बाऊलमध्ये मुरमुरे स्वच्छ धुवून ५ मिनिटांसाठी भिजत ठेवा.    

  • आता दुसऱ्या एका बाऊलमध्ये रवा आणि पाणी एकत्रितपणे मिसळून ५ मिनिटांसाठी तसेच ठेवा.

  • त्यानंतर, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले मुरमुरे, रवा आणि दही घालून गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.

  • आता हे तयार झालेले बॅटर एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लाल तिखट घालून चांगले मिक्स करा.

  • हे बॅटर छान एकजीव झाले की, त्यात सोडा, मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस घाला आणि मिश्रण पुन्हा एकत्र करा.

  • आता अप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवा, त्यात थोड तेल घालून हे बॅटर अप्पे पात्रात घाला.

  • त्यानंतर, दोन मिनिटांसाठी अप्पे पात्रावर झाकण ठेवा.

  • एका बाजूने अप्पे शिजल्यानंतर, दुसरी बाजू याप्रमाणे शिजवून घ्या.

  • तुमचे अप्पे शिजल्यानंतर, गरमागरम अप्पे खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधादरम्यान ECचा मोठा निर्णय; SIRमध्ये वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी, कशी आहे प्रक्रिया?

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

Latest Marathi News Live Update : "आता मला वेदना नाही, तर अभिमान वाटतो" ,कॅप्टन स्मित यांची पंतप्रधान मोदींशी बातचीत

रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याने केलं न्यूड फोटोशूट; अंगावर एकही कपडा नाही; फोटोची जोरदार चर्चा

Heart Health: झिरो शुगर ड्रिंक्स हृदयासाठी सुरक्षित आहेत का? जाणून घ्या कार्डिओलॉजिस्टचा महत्वाचा सल्ला!

SCROLL FOR NEXT