Mysore Masala Dosa esakal
फूड

Mysore Masala Dosa : नाश्त्याला बनवा गरमागरम म्हैसूर मसाला डोसा, नोट करा ही सोपी रेसिपी

Mysore Masala Dosa : म्हैसूर मसाला डोसा खायला अतिशय रूचकर लागतो.

Monika Lonkar –Kumbhar

Mysore Masala Dosa : दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ सकाळच्या नाश्त्यामध्ये खायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. या पदार्थांमध्ये डोसा, इडली, उत्तप्पा, आप्पे, इत्यादींचा समावेश होतो. परंतु, यापैकी एक आणि हटके असलेला म्हैसूर मसाला डोसा सगळ्यात वेगळा आहे. हा म्हैसूर मसाला डोसा खायला अतिशय रूचकर लागतो.

शिवाय, हा डोसा बाहेरून कुरकुरीत असतो आणि आतून त्यावर लाल चटणीचा थर असतो. त्यामुळे, याची चव अप्रतिम लागते. सकाळच्या नाश्त्याला बनवण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हा म्हैसूर मसाला डोसा कसा बनवायचा? चला तर मग जाणून घेऊयात त्याची सोपी रेसिपी.

म्हैसूर मसाला डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ कप तांदूळ

  • ३-४ चमचे उडीद डाळ

  • ३ चमचे तूर डाळ

  • १/४ कप उडीद डाळ

  • २-३ चमचे रवा

  • १ चमचा मेथी दाणे

  • चवीनुसार मीठ

डोसा चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ बटाटे

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ चमचा आलं लसणाची पेस्ट

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • तेल

  • १ चमचा जिरे-मोहरी

  • कढीपत्ता

म्हैसूर मसाला डोसा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • म्हैसूर मसाला डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी रवा सोडून इतर सर्व साहित्य ४ तास भिजत ठेवा.

  • त्यानंतर, त्यात रवा, मीठ आणि पाणी मिसळा.

  • हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून बाजूला ठेवा आणि रात्रभर आंबू द्या.

  • दुसऱ्या बाजूला बटाटे उकडून घ्या आणि ते स्मॅश करा.

  • आलं-लसणाची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा बारीक करून त्याची पेस्ट बनवा.

  • आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी घाला.

  • त्यात आता कांदा आणि पेस्ट घालून परतून घ्या. त्यानंतर, त्यात बटाटा, मीठ आणि कढीपत्ता घाला. बटाटाट्याची डोसा चटणी तयार आहे.

  • आता लाल चटणी बनवण्यासाठी हरभरा डाळ हलकी लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

  • आता कांदा, लसूण आणि आलं बारीक करून घ्या.

  • आता सर्व साहित्य बारीक करून त्याची पेस्ट तयार करा.

  • आता म्हैसूर मसाला डोसा बनवण्यासाठी डोस पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यावर डोसा पीठ पसरून घ्या.

  • डोसाभोवती तेल लावून चांगला डोसा भाजून घ्या.

  • आता डोस्यावर लाल चटणी लावा आणि बटाटा चटणी लावा. तुमचा गरमागरम म्हैसूर मसाला डोसा तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT