how to make navrartan korma restaurant style  Pradnyesh Otari
फूड

Navratan Korma Recipe: लंच असो वा डिनर हॉटेल सारखा नवरतन कुर्मा आता घरीच बनवा

प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक करताना सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे भाजी काय करायची. कोणतिही भाजी केली तरी मुलं नाक मुरडतं असतात. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास भाजीची रेसिपी सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक करताना सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे भाजी काय करायची. कोणतिही भाजी केली तरी मुलं नाक मुरडतं असता. प्रत्येकाच्या आवडी निवडी जपताना गृहिणींच्या नाकीनऊ येते. त्यात हा पावसाळा त्यामुळं बाजारात फारशा अशा चांगल्या भाज्या मिळणं कठीण होतं.

मग डोळ्यांसमोर पनीर येतं. पनीरपासून अनेक विविध भाज्या तयार केल्या जातात. पनीर बुर्जी, पनिर टिक्का, मटर पनिर पण हेदेखील खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास पदार्थाची रेसिपि घेऊन आलो आहोत. ज्याचे नाव सांगताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.

तर आजच घरी बनवा हॉटेल सारखा नवरतन कुर्मा

साहित्य

पाव किलो पनीर

पाव किलो फ्लॉवर

दोन वाट्या मटार

पाव किलो बटाटे

पाव किलो गाजर

पाव किलो श्रावणघेवडा

१० ते १२ लसूण पाकळ्या

दीड इंच आले

५ ते ६ मिरच्या एकत्र वाटून घेणे

१ टी स्पून लाल तिखट

१ टी स्पून गरम मसाला

२ टी स्पून जिरे

चवीनुसार मीठ व साखर

अर्धा किलो मोठे टोमॅटो उकडून सोलून बारीक चिरून

अर्धा किलो कांदे चिरून उकडून

मूठभर काजू तुकडा

१० ते १२ बदाम भिजवून साल काढून

चिमूटभर केशर दोन टे. स्पून दुधात खलून

१ सफरचंद सोलून बारीक तुकडे

छोट्या टिनमधल्या अर्ध्या अननसाचे बारीक तुकडे

१०० ग्रॅम फ्रेश क्रीम, लाल चेरीचे तुकडे सजावटीकरिता

१ वाटीभर तूप

दोन वाट्या गोड घट्ट दही

एक लिंबाचा रस.

कृती :

पनीरचे छोटे तुकडे करून तुपात तळून घ्यावेत. फ्लॉवर मोठे तुरे काढून सोलून मध्यम चिरणे. बटाटे सोलून छोटे चौकोनी तुकडे करणे. गाजर सोलून मधला पिवळा दांडा काढून टाकून छोटे चौकोनी तुकडे करणे. श्रावणघेवडा देठ काढून तिरका छोटा चिरणे. मटारसकट सर्व भाज्या वेगवेगळ्या अर्धवट वाफवून घ्याव्यात. पनीर तळून उरलेले तूप पातेलीत गरम करावे. त्यात दोन चमचे जिरे घालावे उकडलेले कांदे बारीक वाटून घालावे.

थोडे परतून वाटलेलं आलं, लसूण, मिरची घालावी व थोडे थोडे दूध घालत गुलाबी रंगावर परतावे. त्यात चवीनुसार मीठ, हळद, तिखट व गरम मसाला घालून परतावे. दोन वाट्या दही घालून बाजूने तूप सुटेपर्यंत परतावे.

उकडून चिरलेला टोमॅटो घालून परतावे. नंतर सर्व भाज्या घालून परतावे. दोन वाट्या पाणी घालून सर्व भाज्या शिजत आल्यावर अननस, बदाम, काजूचे तुकडे, सफरचंद, केशर घातलेले दूध घालून थोडे उकळू द्यावे. १ लिंबाचा रस व चवीला थोडी साखर घालावी. खोलगट बाऊलमध्ये काढून क्रीम, लाल चेरी, अननसाचे तुकडे व चिरलेली कोथिंबीर घालून सजवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT