Oats Paneer Tikki  sakal
फूड

Oats Paneer Tikki : 10 मिनिटांत नाश्त्यासाठी बनवा हेल्दी 'ओट्स पनीर टिक्की', जाणून घ्या सोपी रेसिपी

आजकाल बहुतेक घरांमध्ये ओट्सचा वापर केला जातो. चला जाणून घेऊया चविष्ट ओट्स पनीर टिक्की टिक्की कशी बनवायची.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल लोक डाएटिंगच्या माध्यमातून वजन कमी करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत काही लोकांना डाएटिंग फूड खूपच कंटाळवाणा वाटतो. आज आम्ही तुम्हाला हेल्दी, चविष्ट आणि वजन कमी करण्याची रेसिपी सांगत आहोत, जे खाल्ल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहील.

तुम्ही घरी ओट्स पनीर टिक्की बनवू शकता. यामुळे शरीराला भरपूर फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी 1 मिळतो. ओट्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आजकाल बहुतेक घरांमध्ये ओट्सचा वापर केला जातो. चला जाणून घेऊया चविष्ट ओट्स पनीर टिक्की कशी बनवायची.

ओट्स पनीर टिक्कीसाठी लागणारे साहित्य

  • ओट्स - 3 कप

  • पनीर - 1 कप

  • बीन्स - 100 ग्रॅम

  • गाजर - 2 कप

  • हिरवी मिरची - 2-3

  • लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

  • धनिया पावडर - 1 टीस्पून

  • काळी मिरी - 1 टीस्पून

  • चवीनुसार मीठ

ओट्स पनीर टिक्की रेसिपी

यासाठी सर्वप्रथम गाजर, बीन्स आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.

आता ओट्स ब्लेंडरमध्ये बारीक करा आणि पनीर देखील बारीक करून घ्या.

आता एका भांड्यात सर्व भाज्या, बारीक केलेलं पनीर आणि ओट्स घालून मिक्स करा.

त्यात सर्व मसाले घालून चांगले मिक्स करून टिक्कीसाठी पीठ तयार करा.

साधारण 10 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा आणि नंतर पीठ घेऊन टिक्की बनवा.

तव्यावर तेल टाका. टिक्की ब्राउन होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

सर्व टिक्की त्याच पद्धतीने तयार करा.

चविष्ट आणि कुरकुरीत ओट्स टिक्की तयार आहेत. तुम्ही ते तुमच्या आवडत्या चटणीसोबत खा.

ओट्स पनीर टिक्की खायला खूप चविष्ट आहे आणि वजन कमी करण्यास मदत करते.

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

Panchang 8 July 2025: आजच्या दिवशी गणपतीला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 8 जुलै 2025

kolhapur News : पावसाचा फटका! 'पन्हाळा तालुक्यातील ३३४० शेतकरी सापडले आर्थिक संकटात'; अद्याप शासनाकडून भरपाई नाही..

SCROLL FOR NEXT