Oats Upma Recipe esakal
फूड

Oats Upma Recipe : नाश्त्याला बनवा हेल्दी अन् टेस्टी ओट्स उपमा, चवीला लागतो भन्नाट, वाचा सोपी रेसिपी

Oats Upma Recipe : ओट्सचे सेवन करणे, आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Oats Upma Recipe : ओट्सचे सेवन करणे,आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. ओट्समध्ये पोषकतत्वांचा खजिना असतो, त्यामुळे, अनेक जण हेल्दी नाश्त्यासाठी आहारात ओट्सचा आवर्जून समावेश करतात. फायबर्सने समृद्ध असलेले ओट्स वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

अशा परिस्थितीमध्ये अनेकांना नाश्त्यामध्ये ओट्स खायला आवडतात. परंतु, कधीकधी केवळ ओट्स खाऊन कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला ओट्स उपमाची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही मसालेदार आणि हेल्दी नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात ओट्स उपम्याची रेसिपी.

ओट्स उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ कप ओट्स

  • जीरे-मोहरी

  • काजूचे ४-५ तुकडे

  • कढीपत्ता

  • आल्याची पेस्ट १ चमचा

  • २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ शिमला मिरची बारीक चिरलेली

  • १ गाजर बारीक चिरलेले

  • अर्धा चमचा हळद

  • अर्धी वाटी वाटाणा

  • १ कप पाणी

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • १ चमचा लिंबाचा रस

  • चवीनुसार मीठ

ओट्स उपमा बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी गॅसवर पॅन किंवा कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तेल घालून जीरे-मोहरी, कढीपत्ता फोडणीला टाका.

  • त्यानंतर, आल्याची पेस्ट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.

  • आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा मऊ झाला की त्यामध्ये सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या, शिमला मिरची, गाजर, फरसबी, वाटाणा, काजूचे तुकडे , हळद, मीठ घालून चांगले परतून घ्या.

  • या सर्व भाज्या शिजल्या की, यामध्ये पाणी मिसळा. १० मिनिटे शिजल्यानंतर पाण्याला उकळी येईल.

  • आता या पाण्यात ओट्स घाला. आता जोपर्यंत पाणी शोषले जात नाही तोपर्यंत ओट्स त्या मिश्रणात ढवळत राहा.

  • आता या ओट्समध्ये लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा.

  • आता तुमचा गरमागरम ओट्स उपमा तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT