Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा पालक पनीर पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

पालक ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पालकमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळून येते. पालकचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास देखील मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : पालक ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पालकमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळून येते. पालकचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास देखील मदत होते. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. त्यात पालकचा देखील समावेश आहे. त्यामुळे, या दिवसांमध्ये पालकचा आहारात जरूर समावेश करायला हवा.

परंतु, अनेकांना पालक खायला आवडत नाही. खास करून लहान मुले पालक खाण्यास टाळाटाळ करतात. मात्र, जर तुम्ही पालकमध्ये पनीर मिसळून त्याचे पराठे केले तर त्याची चव ही वाढते आणि मुलेही हे पराठे आवडीने खातात.

आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात नाश्त्यासाठी बेस्ट असणाऱ्या पालक-पनीर पराठ्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही सोपी रेसिपी.

पालक पनीर पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • पालक – २५० ग्रॅम

  • पनीर – २०० ग्रॅम

  • मैदा – १ कप

  • गव्हाचे पीठ – १ कप

  • बारीक चिरलेला कांदा

  • हिरव्या मिरच्या ४-५

  • जिरेपूड १ चमचा

  • लूसण पाकळ्या ३-४

  • धने (अंदाजानुसार)

  • तूप

  • मीठ चवीनुसार

  • पुदिना

  • धनेपूड १ चमचा

पालक पनीर पराठा बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे :

  • पालक पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी पालक चिरून धुवून घ्या. त्यानंतर, गरम पाण्यात ही भाजी उकळायला टाका. त्यात एक इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाका.

  • आता या मिश्रणात हिरवी मिरची आणि लसूण बारीक चिरलेला घाला. त्यानंतर, हे मिश्रण बाजूला ठेवा.

  • आता मैदा आणि गव्हाचे पीठ चांगले मळून घ्या. आता त्यात हे तयार केलेले पालकाचे मिश्रण, तूप किंवा तेल आणि मीठ घालून पीठ सेट करण्यासाठी बाजूला ठेवा.

  • आता पनीरचे सारण तयार करण्यासाठी सर्वात आधी पनीर स्मॅश करून घ्या. त्यामध्ये, बारीक चिरलेला कांदा, धणे, अर्धा चमचा तिखट घालून मिक्स करा. त्यानंतर, त्यात मीठ, जिरेपूड आणि धनेपूड घालून मिक्स करा.

  • हे मिश्रण आता पराठ्याच्या पीठामध्ये घालून पराठा लाटून घ्या आणि तवा गरम करायाला ठेवून त्यात तूप घालून पराठी दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या.

  • आता चटणीसोबत गरमागरम पराठा सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT