Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : हिवाळ्यात नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पुरी, एकदम सोपी आहे रेसिपी

पालकमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये काही हेल्दी ऑप्शन्स जर तुम्ही शोधत असाल तर पालक पुरीसारखा हेल्दी ब्रेकफास्ट तुम्हाला शोधून मिळणार नाही. हिवाळ्यात तर पालक पुरी आवर्जून खाल्ली जाते.

पालक आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पालकमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. पालक पुरी ही बनवायला अतिशय सोपी आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात पालक पुरी बनवण्याची सोपी रेसिपी.

पालक पूरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • ३ कप पालक चिरलेली

  • २ कप गार पाणी

  • ३ कप गरम पाणी

  • हिरवी मिरची चिरलेली

  • आलं

  • २ कप गव्हाचे पीठ

  • ओवा

  • आवश्यकतेनुसार तेल

  • चवीनुसार मीठ

  • कोथिंबीर

पालक पुरी बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी एक मोठे भांडे किंवा खोलगट पॅन घ्या.

  • त्यात ३ कप गरम पाणी घाला आणि त्यात चिरलेली पालक मिसळा.

  • पालक मऊ होईपर्यंत त्या गरम पाण्यात शिजू द्या.

  • त्यानंतर, एका परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्या.

  • या पीठात पालकाची मऊ पाने, मिरच्या, कोथिंबीर, आलं, ओवा आणि मीठ घाला.

  • नंतर, या मिश्रणात २ कप गार पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.

  • पीठ चांगले एकजीव करून झाले की, १५ मिनिटांसाठी पीठ सेट व्हायला झाकून ठेवा.

  • त्यानंतर, पीठाचे गोळे बनवून घ्या आणि दुसऱ्या बाजूला कढईत तेल गरम करायला ठेवा.

  • आता पुऱ्या लाटून घ्या आणि तेलात सोडा.

  • दोन्ही बाजूंनी पुऱ्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • आता तुमची गरमागरम पालक पुरी तयार आहे. चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT