Papad Paratha esakal
फूड

Papad Paratha : हिवाळ्यात बनवा पापडाचा टेस्टी पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

पापडापासून तुम्ही टेस्टी आणि स्पायसी पराठा बनवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Papad Paratha : अनेकांन नाश्त्यामध्ये गरमागरम पराठे खायला आवडतात. खास करून हिवाळ्यात पराठा खाण्यावर लोक भर देतात. मेथी, बटाटा, पालक आणि कोबीपासून बनवलेले पराठे नाश्त्यामध्ये नेहमीच खाल्ले जातात.

मात्र, तुम्ही पापडापासून ही टेस्टी पराठा बनवू शकता. मार्केटमध्ये तर आजकाल अनेक प्रकारचे पापड मिळतात. हे पापड भाजून त्यापासून चविष्ट पराठे तुम्ही बनवू शकता. हे पराठे कसे बनवायचे? त्याची रेसिपी आपण जाणून घेऊयात.

टेस्टी पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • गव्हाचे पीठ

  • तेल

  • पापड

  • कोथिंबीर

  • तिखट

  • हळद

  • चवीनुसार मीठ

टेस्टी पराठा बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे

  • पापड पराठा बनवण्यासाठी एका परातीमध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये गव्हाचे पीठ चाळून घ्या.

  • आता या पीठामध्ये मीठ, तेल आणि पाणी घालून हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या.

  • पीठ मळून झाल्यानंतर ते ५ मिनिटांसाठी सेट करायला ठेवा.

  • आता पीठ मळून झाल्यानंतर, भाजलेले पापड आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

  • आता या पापडाच्या मिश्रणात तिखट, हळद, कोथिंबीर आणि तुमच्या आवडीचे इतर मसाले घालून छान मिक्स करून घ्या.

  • पराठा करण्यासाठी घेतलेले पीठ पोळपाटावर लाटा आणि त्यात स्टफिंगसाठी हे पापडाचे मिश्रण भरून घ्या.

  • नंतर, नेहमीसारखा पराठा लाटून घ्या. तुमचा गरमागरम पराठा तयार आहे.

  • वरून मस्त तूप घालून गरमागरम पराठा सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT