Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा हेल्दी आणि टेस्टी बटाटा ब्रेड बॉल्स, एकदम सोपी आहे रेसिपी

सकाळच्या नाश्त्याला काहीतरी वेगळ आणि हेल्दी प्रत्येकाला खावसं वाटत.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक जण ब्रेड ऑम्लेट, सॅंडविच, पोहे, उपमा इत्यादी पदार्थ खातात. परंतु, सारखे हे पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊन बोअर होते. सकाळच्या नाश्त्याला काहीतरी वेगळ आणि हेल्दी प्रत्येकाला खावसं वाटत. मात्र, या रोजच्या त्याच पदार्थांमुळे हा नाश्ता कंटाळवाणा ठरू शकतो.

मात्र, तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. आज आम्ही खास तुमच्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी ऑप्शन घेऊन आलो आहोत. कोणता आहे हा ऑप्शन? चला तर मग जाणून घेऊयात.

बटाटा ब्रेड बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे (Potato Bread Balls Ingredients)

  • ब्रेड स्लाईस

  • ३-४ बटाटे

  • लाल तिखट (१चमचा)

  • गरम मसाला (१किंवा अर्धा चमचा)

  • चवीनुसार मीठ

  • चाट मसाला (अंदाजानुसार)

बटाटा ब्रेड बॉल्स बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी बटाटे उकडून घ्या. त्यानंतर, ते थंड झाले की ते सोलून घ्या.

  • त्यानंतर, ब्रेड स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. जेणेकरून त्याचे ब्रेड क्रंम्ब्स बनतील.

  • त्यानंतर, बटाटे चांगले स्मॅश करून घ्या.

  • उरलेल्या ब्रेडचे स्लाईस पाण्यात बुडवून ते बाहेर काढून घ्या. त्यातले सगळे पाणी पिळून काढा.

  • आता या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये हे ब्रेड घालून ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • जेणेकरून ब्रेड हे बटाट्यामध्ये पूर्ण मिसळेल.

  • आता या मिश्रणात तुमच्या चवीनुसार मीठ, तिखट, गरम मसाला आणि चाट मसाला घालून हे मिश्रण चांगेल मळून घ्या.

  • हे मिश्रण मऊ झाले की, हाताला थोडे तेल लावून घ्या आणि या पीठाचे बारीक गोळे करून घ्या.

  • त्यानंतर, कढईमध्ये तेल गरम करून हे गोळे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • तुमचे टेस्टी आणि हेल्दी पोटॅटो ब्रेड बॉल्स तयार आहेत. तुम्ही चटणीसोबत किंवा सॉस सोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पुण्यात इंदुरीकर महाराज आणि पोलिसांमध्ये बाचाबाची! आयोजक धावले अन्...

Mumbai Traffic: लिओनेल मेस्सी मुंबईत येणार, वाहतुकीत मोठे बदल; कधी अन् काय? वाचा...

14 Fours, 23 Sixes! ट्वेंटी-२० सामन्यात स्कॉट एडवर्ड्सचं द्विशतक; ८१ चेंडूंत चोपल्या २२९ धावा

Malegaon Crime : मालेगावात अंमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा 'वचक'! तीन वर्षांत तब्बल ९७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update: इंडिगो आज २,०५० पेक्षा जास्त विमानांचे संचालन करणार

SCROLL FOR NEXT