Punjabi Aloo Paratha esakal
फूड

Punjabi Aloo Paratha : नाश्त्याला बनवा पंजाबी पद्धतीचा बटाट्याचा पराठा, वाचा 'ही' सोपी रेसिपी

Punjabi Aloo Paratha: सकाळच्या नाश्त्यामध्ये पोह्यापासून ते पराठ्यापर्यंत आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो.

Monika Lonkar –Kumbhar

Punjabi Aloo Paratha : भारतीय स्वयंपाकघरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यामध्ये पोह्यापासून ते पराठ्यापर्यंत आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो. या सगळ्यात आलू पराठा अर्थात बटाट्टाचा पराठा हा आपल्या सर्वांच्या आवडीचा आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पराठा खायला आवडतो.

तुम्ही आतापर्यंत साध्या पद्धतीने बनवलेला बटाट्याचा पराठा खाल्ला असेल. परंतु, तुम्ही कधी पंजाबी पद्धतीने बनवलेला बटाट्याचा पराठा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे. हा पंजाबी पद्धतीचा आलू पराठा कसा बनवायचा? चला तर मग जाणून घेऊयात ही रेसिपी.

पंजाबी पद्धतीने बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • कणीक २ कप

  • मैदा १ कप

  • उकडलेले बटाटे ३

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • लसुणाची पेस्ट १ चमचा

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • धना-जिरे पावडर १ चमचा

  • १ चमचा हळद

  • लाल तिखट १ चमचा

  • ३ चमचे तेल

  • तूप-तेल तळण्यासाठी

  • चवीनुसार मीठ

पंजाबी पद्धतीने बटाट्याचा पराठा बनवण्याची सोपी पद्धत :

  • पंजाबी पद्धतीने बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात कणिक आणि मैदा घ्या.

  • आता त्यामध्ये ३ चमचे तेल आणि मीठ मिसळून पीठ चांगले मिक्स करा.

  • आता त्यात पाणी मिक्स करून झाल्यावर पीठ चांगले मळून घ्या.

  • मळलेल्या पीठाला थोडे तेल लावून झाकून ठेवा आणि १५ मिनिटे असेच ठेवा.

  • त्यानंतर, बटाट्याचा मसाला तयार करण्यासाठी वेगळे भांडे घ्या आणि त्यात बटाटे चांगले स्मॅश करून घ्या.

  • या मिश्रणात आता कांदा, लसुणाची पेस्ट, कोथिंबीर, हळद आणि इतर मसाले घाला.

  • आता चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण मिक्स करा.

  • आता या मिश्रणाचे गोळे बनवा आणि मळलेली कणिक लाटायला घ्या. त्यामध्ये बटाट्याच्या मसाल्याचा गोळा स्टफ करा आणि पराठे लाटून घ्या.

  • पॅनवर किंवा तव्यावर तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूंनी पराठा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • तुमचा गरमारगम पंजाबी पद्धतीचा आलू पराठा तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT