Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी नाचणीचे धिरडे, एकदम सोपी आहे रेसिपी

नाचणीमध्ये पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळे आणि हेल्दी खायचे असेल तर नाचणीचे धिरडे हा बेस्ट ऑप्शन आहे. नाचणीमध्ये पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. नाचणीपासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आवर्जून बनवले जातात.

आज आपण नाचणीच्या पीठाचा वापर करून केल्या जाणाऱ्या चविष्ट धिरड्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग जाणून घेऊयात नाचणीच्य धिरड्याची पौष्टिक रेसिपी.

नाचणीचे धिरडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • नाचणीचे पीठ १ वाटी

  • अर्धी वाटी दही

  • कोथिंबीर

  • तेल किंवा तूप

  • चवीनुसार मीठ

  • कोमट पाणी

  • हिरव्या भाज्या

  • तिखट

नाचणीचे धिरडे बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • एका भांड्यात किंवा परातीमध्ये नाचणीचे पीठ घ्या.

  • या पीठामध्ये अर्धी वाटी दही, मीठ,तिखट आणि हिरव्या भाज्या मिसळा.

  • आता यामध्ये कोमट पाणी मिसळून हे सर्व घटक चांगल्या प्रकारे एकत्र करून पीठ घट्ट बनवा.

  • आता या पीठात तूप किंवा तेल घाला.

  • त्यानंतर, गॅसवर पॅन किंवा तवा ठेवा.

  • आता या पॅन किंवा तव्यावर तेल पसरवा आणि नाचणीच्या धिरड्याचे पीठ पसरून घ्या.

  • हे धिरडे आता दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत चांगले शिजवून घ्या.

  • तुमचे नाचणीचे धिरडे तयार आहे.

  • आता गरमागरम नाचणीचे धिरडे लोणचे, टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT