Ragi Dosa Recipe esakal
फूड

Ragi Dosa Recipe : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी नाचणीचा डोसा, एकदम सोपी आहे रेसिपी

Ragi Dosa Recipe : नाचणीमध्ये कॅल्शिअम, प्रथिने, फायबर आणि इतर पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळते. नाचणीपासून तुम्ही नाश्त्याला चविष्ट नाचणी डोसा बनवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Ragi Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी आणि टेस्टी खाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. शिवाय, रोजचे तेच नाश्त्याचे पदार्थ खायला कंटाळा देखील येतो. त्यामुळे, पोहे, इडली, उपमा, शिरा यांना एक वेगळा पर्याय म्हणून तुम्ही नाचणीची निवड करू शकता. नाचणी हे धान्य ग्लुटेनमुक्त असून या नाचणीपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवू शकता.

नाचणीपासून तुम्ही नाश्त्याला चविष्ट नाचणी डोसा बनवू शकता. नाचणीमध्ये कॅल्शिअम, प्रथिने, फायबर आणि इतर पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, नाचणीचे सेवन जरूर करावे.

नाचणीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. नाचणीपासून तुम्ही क्रिस्पी आणि चविष्ट असा डोसा देखील बनवू शकता. हा नाचणीचा डोसा बनवायला अतिशय सोपा आहे. नाश्त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग जाणून घेऊयात नाचणीचा डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.

नाचणीचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • नाचणीचे पीठ १ वाटी

  • रवा १ वाटी

  • तांदळाचे पीठ १ वाटी

  • दही अर्धा कप

  • हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

  • बारीक चिरलेले आले

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ चमचा जिरे

  • चवीनुसार मीठ

  • तेल

  • पाणी आवश्यकतेनुसार

नाचणीचा डोसा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • नाचणीचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एक मोठे बाऊल घ्या.

  • या बाऊलमध्ये १ वाटी नाचणी, रवा आणि तांदळाचे पीठ चांगले मिसळून घ्या.

  • त्यानंतर, यामध्ये दही, आले, हिरवी मिरची, कांदा, जिरे, कांदा आणि मीठ टाका.

  • आता या पीठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून डोसा बॅटर बनवून घ्या.

  • त्यानंतर हे पीठ १५-२० मिनिटांसाठी सेट करायला ठेवा.

  • आता गॅसवर डोसा पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा.

  • त्यात थोडे तेल पसरून त्यावर नाचणी डोश्याचे पीठ पसरवा.

  • आता दोन्ही बाजूंनी थोडे तेल घालून नाचणी डोसा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • तुमचा चविष्ट आणि हेल्दी नाचणी डोसा तयार आहे.

  • नारळाची चटणी किंवा बटाट्याच्या चटणीसोबत हा गरमागरम नाचणी डोसा सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT