Rava Cutlet Recipe esakal
फूड

Rava Cutlet Recipe : नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट रवा कटलेट, एकदम सोपी आहे रेसिपी

Rava Cutlet Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी रवा कटलेट हा उत्तम पर्याय आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Rava Cutlet Recipe : दररोज सकाळचा नाश्ता बनवणे हे काही सोपे काम नाही. कारण, रोज नाश्त्यात काय बनवावे? हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पोहे, उपमा, इडली, पराठा हे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे, काहीतरी वेगळे खाण्याची सगळ्यांचीच इच्छा होते. त्यात सगळीकडे असा उनपावसाचा लपंडाव सुरू असल्यामुळे नाश्त्यात काहीतरी टेस्टी करून खावे असे अनेकांना वाटते.  

आज आम्ही खास तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव रवा कटलेट असे आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात रवा कटलेटची सोपी रेसिपी.

रवा कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • उकडलेले बटाटे ३

  • अर्धा कप रवा

  • लाल तिखट १ चमचा

  • चाट मसाला अर्धा चमचा

  • १ चमचा गरम मसाला

  • जीरा पावडर १ चमचा

  • चवीनुसार मीठ

  • तेल आवश्यकतेनुसार

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

रवा कटलेट बनवण्याची सोपी पद्धत

  • रवा कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या.

  • आता एका बाऊलमध्ये बटाट्याचे मिश्रण घ्या. या बटाट्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, मीठ, जीरा पावडर घाला आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  • त्यानंतर कढई गरम करायला ठेवा. या कढईत तेल घालून त्यात जीरे आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या.

  • आता या फोडणीत बटाट्याचे मिश्रण चांगले परतून घ्या.

  • या मिश्रणात आता रवा घाला. रवा आणि बटाट्याचे मिश्रण जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत हे मिश्रण चांगले परतून घ्या.

  • आता हे मिश्रण थंड करायला ठेवा.

  • त्यानंतर, हाताला तेल लावून या मिश्रणाचे कटलेट बनवायला घ्या.

  • तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट बनवा आणि गॅसवर कढई किंवा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा.

  • मंद आचेवर तेल गरम झाल्यानंतर, त्यात हे कटलेट तळून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत कटलेट छान तळून घ्या.

  • तुमचे रव्याचे कटलेट तयार आहेत. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत हे कटलेट सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT