Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा रव्याचा कुरकुरीत मेदूवडा, एकदम सोपी आहे रेसिपी

सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्हाला काही आरोग्यदायी आणि चविष्ट खायचे असेल तर तुम्ही मेदूवडा खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेणे हे अनेकांना आवडते.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्हाला काही आरोग्यदायी आणि चविष्ट खायचे असेल तर तुम्ही मेदूवडा खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेणे हे अनेकांना आवडते. शिवाय, आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर देखील आहेत.

परंतु, जर तुम्हाला इडली आणि डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही रवा मेदूवडा नक्कीच बनवू शकता. गरमागरम सांबर किंवा चटणीसोबत हा रवा मेदूवडा खूपच टेस्टी लागतो.

विशेष म्हणजे रव्यापासून मेदूवडा लगेच बनवला जातो, हा मेदूवडा पचायला देखील चांगला असतो. हिवाळ्यात शरीर ऊबदार ठेवण्यासाठी मेदूवडा फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात मेदूवडा बनवण्याची रेसिपी.

रवा मेदूवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • रवा १ कप

  • अर्धी वाटी दही

  • १ कप पाणी

  • जीरा १ चमचा

  • ४-५ कढिपत्ता

  • तेल

  • बेकिंग सोडा

  • कोथिंबीर

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • चवीनुसार मीठ

रवा मेदूवडा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी एक मोठे बाऊल घ्या आणि त्यामध्ये रवा आणि दही घालून चांगल्या पद्धतीने मिसळा.

  • यानंतर, त्यात चिरलेली हिरवी मिरची, मीठ आणि कढीपत्ता, कोथिंबीर घालून मिक्स करा. आता त्यात थोडे पाणी घालून मेदूवड्याचे घट्ट पीठ तयार करा.

  • आता हे पीठ १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. त्यानंतर, या पीठात बेकिंग सोडा घालून पीठ चांगले मिक्स करून घ्या.

  • पीठ जास्तच घट्ट झाले असेल तर त्यात तुम्ही थोडे पाणी मिसळू शकता.

  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा.

  • तेल गरम होत असताना तुमच्या हातावर मेदूवड्याचे थोडे मिश्रण घेऊन त्यावर गोल करा आणि मधोमध अंगठ्यापेक्षा मोठे छिद्र तयार करा.

  • आता तेलात हे मेदूवडे तळून घ्या. सोनेरी होईपर्यंत हे वडे तळा.

  • नाश्त्यासाठी तुमचा कुरकुरीत रव्याचा मेदूवडा तयार आहे.

  • हा मेदूवडा तुम्ही सांबार किंवा चटणीसोबत ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT