Rava Uttapam Recipe esakal
फूड

Rava Uttapam Recipe : नाश्त्याला बनवा गरमागरम चविष्ट रवा उत्तप्पम, दिवसभर राहील एनर्जी, एकदम सोपी आहे रेसिपी

Rava Uttapam Recipe : उत्तप्पम हा नाश्त्यासाठी बेस्ट पदार्थ आहे. तांदूळ-उडीद डाळीचा उत्तप्पम तुम्ही आतापर्यंत खाल्ला असेल. मात्र, रव्यापासून बनवला जाणारा रवा उत्तप्पम तुम्ही खाल्ला आहे का?

Monika Lonkar –Kumbhar

Rava Uttapam Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये दाक्षिणात्य पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडते. या पदार्थांमध्ये इडली, डोसा, उत्तप्पम, आप्पे इत्यादी अनेक खाद्यपदार्थांचा समावेश असतो. उत्तप्पम हा नाश्त्यासाठी बेस्ट पदार्थ आहे. तांदूळ-उडीद डाळीचा उत्तप्पम तुम्ही आतापर्यंत खाल्ला असेल. मात्र, रव्यापासून बनवला जाणारा रवा उत्तप्पम तुम्ही खाल्ला आहे का?

हा रव्यापासून बनवला जाणारा रवा उत्तप्पम सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. रव्यापासून तुम्ही चवदार उत्तप्पम बनवू शकता. शिवाय, हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे. तुम्ही झटपट पद्धतीने हा पदार्थ बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या रवा उत्तप्पमची सोपी रेसिपी.

रवा उत्तप्पम बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ कप रवा

  • बारीक चिरलेला टोमॅटो – अर्धी वाटी

  • बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी

  • हिरवी मिरची बारीक चिरलेली – २ चमचे

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • दही – अर्धी वाटी

  • चवीनुसार मीठ

  • तेल आवश्यकतेनुसार

रवा उत्तप्पम बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • रवा उत्तप्पम बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा भांड्यात रवा आणि दही एकत्र करा.

  • हे मिश्रण चमच्याने चांगले एकजीव करून घ्या.

  • त्यानंतर, त्यात एक कप पाणी आणि चिमूटभर मीठ मिसळून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  • आता हे मिश्रण झाकून तासभर बाजूला ठेवा. या दरम्यान उत्तप्पमचे पीठ चांगले फुगेल आणि मुरेल.

  • त्यानंतर, तासाभराने या उत्तप्पमच्या पीठात बारीक चिरलेल्या सर्व भाज्या, जसे की टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगले मिसळा.

  • आता गॅसवर डोसा पॅन गरम करायला ठेवा. या पॅनवर उत्तप्पमचे पीठ घातल्यावर त्यावर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वरून कांदा, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो पसरवू शकता.

  • आता काही सेकंदांनंतर उत्तप्पमची बाजू उलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूने उत्तप्पम सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • तुमचा क्रिस्पी आणि खमंग उत्तप्पम तयार झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या.

  • आता चविष्ट नारळाच्या चटणीसोबत हा गरमागरम रवा उत्तप्पम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT