Rawa Toast Recipe esakal
फूड

Rawa Toast Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा टोस्ट, जाणून घ्या सोपी रेसिपी

Rawa Toast Recipe in Marathi : रव्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. परंतु, तुम्ही कधी रव्यापासून बनवलेली रवा टोस्टची रेसिपी ट्राय केली आहे का?

Monika Lonkar –Kumbhar

Rawa Toast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय बनवावे?असा प्रश्न अनेकांना पडतो. पोहे, उपमा, इडली, डोसा असे नेहमीचे पदार्थ नाश्त्याला खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यामुळे, काहीतरी वेगळे आणि टेस्टी खाण्याची इच्छा सगळ्यांची होते. आपल्याकडे रव्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. परंतु, तुम्ही कधी रव्यापासून बनवलेली रवा टोस्टची रेसिपी ट्राय केली आहे का?

जर नसेल केली तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवता येणारी रवा टोस्ट रेसिपी सांगणार आहोत. शिवाय, ही रेसिपी बनवायला फार साहित्याची गरज ही भासत नाही. ही रवा टोस्ट रेसिपी कशी बनवायची? चला तर मग जाणून घेऊयात.

रवा टोस्ट रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • अर्धा कप दही

  • अर्था कप रवा

  • २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • १ छोटा बारीक चिरलेला कांदा

  • १ टोमॅटो बारीक चिरलेला

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • ब्रेड स्लाईस

  • हिरवी चटणी

  • तूप किंवा बटर

रवा टोस्ट बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका बाऊलमध्ये अर्धा कप रवा, अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी मिसळून घ्या.

  • हे मिश्रण चांगले मिसळल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.

  • आता त्यात अर्धा चमचा मीठ घाला.

  • या मिश्रणात तुम्ही किसलेले चीज आणि गाजर देखील घालू शकता.

  • आता हे मिश्रण १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा.

  • आता ब्रेडचे स्लाईस घ्या. त्यावर हिरवी चटणी पसरून घ्या.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ब्रेडच्या कडा काढू शकता.

  • आता या ब्रेडवर रव्याचे मिश्रण पसरवा.

  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर तवा गरम करायला ठेवा. त्यावर लोणी किंवा तूप लावावे.

  • ब्रेडच्या ज्या बाजूवर रव्याचे मिश्रण लावले आहे ती बाजू चांगली भाजून घ्या.

  • आता ब्रेडच्या वरच्या बाजूला बटर लावा आणि खालचा भाग शिजला की ब्रेड उलटा करून त्याची दुसरी बाजू भाजून घ्या.

  • अशा प्रकारे ब्रेडच्या दोन्ही बाजू भाजून घ्या. तुमचा रवा टोस्ट तयार आहे.

  • चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत हा रवा टोस्ट तुम्ही सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT