Sandwich Uttapa Recipe Sakal
फूड

Sandwich Uttapa Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा सॅंडविच उत्तप्पा, जाणून घ्या रेसिपी

Sandwich Uttapa Recipe: सकाळी नाश्त्यात एकाच प्रकारचे सँडविच खाऊन बोरं झाले असेल तर सॅंडविच उत्तप्पा बनवू शकता. हा उत्प्पा बनवणे सोपे असून चवदार देखील आहे.

पुजा बोनकिले

सप्ताहिक सकाळ

Sandwich Uttapa Recipe: सकाळी नाश्त्यात रोज एकाच प्रकराचे सँडविच खाऊन बोरं झाले असेल तर सँडविच उत्तपा बनवू शकता. हा उत्तपा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. उत्तपा लहानांपासून मोठ्यापर्यंच सर्वांना आवडते. हा उत्पप्पा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.

सॅंडविच उत्तप्पा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उत्तप्पा

अर्धा वाटी उडीद डाळ

अर्धा वाटी सालाची मूगडाळ

२ वाट्या उकडे तांदूळ

तेल

चटणी

एक वाटी ओवा

कढीपत्ता

पुदिना पाने एकत्र

आलं

लसूण

हिरवी मिरची चवीनुसार

१ वाटी ओले खोबरे

लिंब

सैंधव

काकडी

टोमॅटो चकत्या

सॅंडविच उत्तप्पा बनवण्याची कृती

उत्तप्पा करण्याच्या आदल्या दिवशी डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजवावे. ७ ते ८ तास भिजल्यानंतर त्याच पाण्यात वाटावे. मिश्रणात चवीनुसार सैंधव घालून ढवळून ठेवावे. चटणीचे सर्व साहित्य एकत्र करून सरसरीत चटणी वाटावी. फार पाणी ठेवू नये. काकडी, टोमॅटोच्या चकत्या कराव्यात. फ्रायपॅनला तेल लावून अंदाजे सहा इंच व्यासाचा उत्तप्पा घालावा. एक बाजू व्यवस्थित भाजल्यावर परतावा. उलथण्याने दोन अर्धगोल करावे. एका अर्धगोलाकारावर चटणीचा थर, टोमॅटो काकडीचा थर देऊन दुसरा अर्धगोल वर दाबावा. मध्ये कापून त्रिकोणी आकार द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT