Sewai Upma Recipe esakal
फूड

Sewai Upma Recipe : नाश्त्याला झटपट बनवा गरमागरम शेवई उपमा, पोट ही भरणार अन् चवदारही होणार!

Sewai Upma Recipe : शेवया खायला तर सगळ्यांनाच आवडतात. शेवयांपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Sewai Upma Recipe : शेवया खायला तर सगळ्यांनाच आवडतात. शेवयांपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. या शेवया खायला अतिशय चविष्ट लागतात. या शेवयांपासून गोड पदार्थ खास करून बनवले जातात.

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, तुम्ही सकाळच्या नाश्त्याला गोड शेवया करण्याऐवजी तिखट शेवया देखील करू शकता. या तिखट शेवयाला ‘शेवई उपमा’ असे ही म्हटले जाते.

हा शेवई उपमा नाश्त्याला बनवायला अतिशय सोपा आहे. शिवाय, हा तिखट शेवई उपमा बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज ही पडत नाही. आज आपण ही शेवई उपमा करण्याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

शेवई उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • 2  वाटी बारीक शेवया

  • जिरे

  • मोहरी

  • तेल

  • कढीपत्ता

  • हिरव्या मिरच्या २-४

  • बारीक चिरलेला टोमॅटो - १

  • शेंगदाणे

  • हळद अर्धा चमचा

  • बारीक चिरलेला कांदा १

  • अर्धी वाटी मटार

  • चवीनुसार मीठ

  • पाणी

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

शेवई उपमा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • शेवई उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये शेवया १ चमचा तेल किंवा तूपामध्ये सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • त्यानंतर, या शेवया एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून ठेवा.

  • आता गॅसवर कढईत तेल घालून त्यात जिरे-मोहरी, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, मिरच्या आणि कढीपत्ता घालून चांगले परतून घ्या.

  • या मिश्रणात आता चिमूटभर हळद, आणि मटार घालून चांगले परतून घ्या.

  • मटारसोबत तुम्ही गाजर, शिमला मिरची देखील यात बारीक चिरून घालू शकता.

  • आता हे मिश्रण चांगले परतल्यानंतर त्यात तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी मिसळा आणि त्यात मीठ घाला.

  • या मिश्रणाला उकळी येईपर्यंत ते चांगले शिजू द्या.

  • १० ते १५ मिनिटांनंतर शेवया शिजल्यानंतर गॅस बंद करा. तुमचा गरमागरम शेवई उपमा तयार आहे.

  • त्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून शेवई उपमा खायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : भारतातील अमेरिकन दूतावासाचे ट्विट व्हायरल

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT