Soya Upma Recipe esakal
फूड

Soya Upma Recipe : नाश्त्यामध्ये बनवा प्रथिनांनी समृद्ध असलेला सोयाबीन उपमा, चवदारही लागणार अन् पोट ही भरणार.!

Soya Upma Recipe : सोयाबीन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. सोयाबीनपासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात

Monika Lonkar –Kumbhar

Soya Upma Recipe : सोयाबीन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. सोयाबीनपासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असलेल्या या सोयाबीनपासून स्वादिष्ट उपमा बनवला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हा उपमा बनवायला फार साहित्याची गरज पडत नाही. तसेच, अगदी कमी वेळात हा उपमा तयार होतो.

सोयाबीन उपमा केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे. हा उपमा कसा बनवायचा? याची सोपी रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात चविष्ट सोयाबीन उपम्याची रेसिपी.

सोयाबीन उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • सोयाबीन पावडर १ कप

  • बारीक चिरलेला कांदा १

  • बारीक चिरलेले गाजर १

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • लिंबू १

  • हिंग चिमूटभर

  • जिरे-मोहरी १ चमचा

  • हळद चिमूटभर

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार तेल

सोयाबीन उपमा बनवण्याची सोपी पद्धत :

  • सर्वात आधी एका पॅनमध्ये १ ग्लास पाणी घ्या. हे पाणी गरम करायला ठेवा.

  • या पाण्यात सोयाबीन पावडर घाला. साधारण १५ मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि यातील सोयाबीन पावडर काढून घ्या आणि उरलेले पाणी टाकून द्या.

  • आता कढई गरम करायला ठेवा, यात थोड तेल घालून त्यात जीरे-मोहरी आणि हिंग, चिमूटभर हळद घाला.

  • फोडणी चांगली बसल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर घाला.

  • हे सर्व घटक चांगले परतून घेतल्यानंतर त्यात सोयाबीन पावडर घालून चांगले शिजवून घ्या.

  • या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर, हा उपमा १०-१५ मिनिटांसाठी चांगला शिजू द्या.

  • त्यानंतर, सोयाबीन उपमावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून गरमागरम उपमा सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT