Soyabean Tikka Recipe esakal
फूड

Soyabean Tikka Recipe : सोयाबीनची ‘ही’ डिश चाखल्यानंतर तुम्हाला मांसाहाराची आठवण नाही येणार

सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि फायबर्सचा समावेश असतो. त्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी सोयाबीन अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Soyabean Tikka Recipe : हिवाळ्यात स्टार्टर्स खाण्याची एक वेगळीच मजा असते. अनेक जण जेवणापूर्वी पनीर टिक्का, पनीर चिली, हराभरा कबाब आणि व्हेज मंच्युरिअन खातात. मात्र, प्रत्येक वेळी हेच पदार्थ खाऊन आपल्याला बोअर व्हायला होत. तुम्ही देखील हे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला स्टार्टरसाठी एक वेगळी रेसिपी सांगणार आहोत.

या रेसिपीचे नाव आहे सोयाबीन टिक्का. ही सोयाबीन टिक्क्याची रेसिपी तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता. सोयाबीन आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि फायबर्सचा समावेश असतो. त्यामुळे, ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी कशी बनवायची ते आज आपण जाणून घेऊयात. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.

सोयाबीन टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • सोयाबीन (१५-२०)

  • बेसन १ वाटी

  • दही – १ वाटी

  • लाल तिखट १ चमचा

  • हळद चिमूटभर

  • शिमला मिरची १

  • कांदा १

  • हिरव्या मिरच्या २-३

  • तेल

  • आले-लसूण पेस्ट

सोयाबीन टिक्का बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी २-३ तासांसाठी सोयाबीन पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर, सोयाबीनमधील पाणी पिळून ते बाजूला काढून ठेवा.

  • आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा. या गरम झालेल्या तव्यात एक वाटी बेसन भाजून घ्या. त्यानंतर, बेसन गरम करून ते थंड करायला ठेवा.

  • त्यानंतर, एक बाऊल घ्या. या बाऊलमध्ये एक वाटी दही घ्या. या दह्यामध्ये भाजलेले बेसन, लाल तिखट आणि चिमूटभर हळद मिक्स करा. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळा.

  • जर तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये तुम्ही पाणी देखील मिसळू शकता. त्यानंतर, हे मिश्रण २०-२५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

  • त्यानंतर, दुसऱ्या बाजूला कढई किंवा पॅन गरम करा. त्यात तेल घाला.

  • आता या तेलात आले-लसणाची पेस्ट, कांदा आणि ढोबळी मिरची घालून चांगले परतून घ्या.

  • आता यामध्ये सोयाबीन घाला आणि तयार केलेले दह्याचे मिश्रण त्यात घाला.

  • २०-२५ मिनिटे सोयाबीन चांगले शिजू द्या. तुम्हाला ग्रेव्ही हवी असल्यास गॅस बंद करा किंवा हे मिश्रण आटवून तुम्ही ड्राय सोयाबीन टिक्का सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT