Strawberry Milkshake esakal
फूड

Strawberry Milkshake : उन्हाळ्यात ताज्या स्ट्रॉबेरीपासून बनवा झटपट स्ट्रॉबेरी मिल्कशेक, उन्हाच्या झळांपासून मिळेल आराम

Strawberry Milkshake : उन्हाळा आला की, शरीराला थंडावा देणाऱ्या खाद्यपदार्थांचा आणि पेयांचा आपण आहारात समावेश करतो. यामध्ये ताक, दही, ज्यूस, लिंबू पाणी, फ्रेश लाईम सोडा, कैरीचे पन्हे, विविध प्रकारचे मिल्कशेक, आईसक्रीम इत्यादी गोष्टींचे सेवन करण्यावर भर दिला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Strawberry Milkshake : उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, या दिवसांमध्ये आपण आरोग्याची, त्वचेची आणि केसांची खास काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळा आला की, शरीराला थंडावा देणाऱ्या खाद्यपदार्थांचा आणि पेयांचा आपण आहारात समावेश करतो. यामध्ये ताक, दही, ज्यूस, लिंबू पाणी, फ्रेश लाईम सोडा, कैरीचे पन्हे, विविध प्रकारचे मिल्कशेक, आईसक्रीम इत्यादी गोष्टींचे सेवन करण्यावर आपण भर देतो.

या दिवसांमध्ये हमखास मिळणारी स्ट्रॉबेरी खायला कुणाला आवडत नाही. या ताज्या स्ट्रॉबेरीपासून विविध प्रकारचे ज्यूस, लस्सी, आईसक्रीम, केक आणि मिल्कशेक बनवले जातात. तुम्ही घरच्या घरी देखील ताज्या स्ट्रॉबेरीपासून मिल्कशेक, स्मूदी, बनवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात आईसक्रीम देखील घालू शकता. आज आपण हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १० ते २० स्ट्रॉबेरी

  • १ कप थंड दूध

  • बर्फाचे तुकडे

  • साखर चवीनुसार

  • मीठ

स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी ताज्या स्ट्रॉबेरी बारीक चिरून घ्या.

  • त्यानंतर, मिक्सरमध्ये १ कप थंड दूध घ्या, त्यामध्ये स्ट्रॉबेरी, साखर घाला.

  • याची पेस्ट तयार झाल्यानंतर, यामध्ये बर्फाचे तुकडे घाला.

  • तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये बर्फाचे तुकडे मिसळू शकता.

  • आता तुमचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे. याची एकदा चव घेऊन पाहा, की यामध्ये साखर योग्य प्रमाणात मिसळली आहे की नाही ते.

  • तुम्ही हवे असल्यास त्यात थोड मीठ मिसळू शकता.

  • आता एका मोठ्या ग्लासमध्ये हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक काढा आणि त्यावर स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांनी सुंदर सजावट करा. तुमचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मिल्कशेकमध्ये आईसक्रीम देखील मिसळू शकता. यामुळे, तुमच्या मिल्कशेकला मस्त चव येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT