Sweet Potato Cutlets esakal
फूड

Sweet Potato Cutlets : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा टेस्टी आणि हेल्दी रताळ्याचे कटलेट्स, एकदम सोपी आहे रेसिपी

हिवाळ्यातील सुपरफूड म्हणून ही रताळ्याला ओळखले जाते. आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असणारे रताळे चवीला अतिशय रूचकर लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Sweet Potato Cutlets : हिवाळ्यात अनेक प्रकारच्या पालेभाज्या आणि कंदमुळे बाजारात येतात. आपल्या शरीराला ऊबदार ठेवणाऱ्या विविध पालेभाज्यांची आवक ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होते. हिवाळ्यातील सुपरफूड म्हणून रताळ्याला ओळखले जाते. आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असणारे रताळे चवीला अतिशय रूचकर लागते.

आपल्या शरीराला ऊबदार ठेवण्याचे काम रताळे करते. या रताळ्यापासून विविध प्रकारच्या रेसिपीज बनवल्या जातात. आज आपण खास नाश्त्यासाठी बनवले जाणारे रताळ्याचे कटलेट्स कसे बनवायचे? ते जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही सोपी रेसिपी.

रताळ्याचे कटलेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • २ मोठे रताळे उकडून स्मॅश केलेले

  • ब्रेडक्रम्ब्स अर्धा कप

  • १ बारीक चिरलेला कांदा

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

  • लाल तिखट १ चमचा

  • गरम मसाला अर्धा चमचा

  • चवीनुसार मीठ

  • तळण्यासाठी तेल

रताळ्याचे कटलेट्स बनवण्याची योग्य पद्धत

  • सर्वात आधी रताळे धुवून सोलून घ्या आणि मऊ होईपर्यंत उकडून घ्या.

  • आता उकडलेले रताळे स्मॅश करून घ्या.

  • या स्मॅश केलेल्या रताळ्यांमध्ये ब्रेडक्रम्ब्स, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घाला.

  • त्यानंतर, हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. आता या मिश्रणाचे कटलेट्स बनवा.

  • गोल आकारात, चौकोनी आकारात किंवा तुमच्या आवडीच्या आकारात तुम्ही हे कटलेट्स बनवू शकता.

  • आता एका बाजूला गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घाला.

  • तेल गरम झाले की, हळुवारपणे कटलेट त्या तेलात सोडा.

  • त्यानंतर, सोनेरी होईपर्यंत हे कटलेट्स मस्त शॅलो फ्राय करून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी हे कटलेट्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या.

  • तुमचे रताळ्याचे स्वादिष्ट कटलेट्स तयार आहेत.

  • टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही हे कटलेट्स खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT