Sprouts Salad sakal
फूड

Sprouts Salad Recipe: हे स्प्राउट सॅलेड शरीरातील प्रोटीनची कमतरता करेल पूर्ण, व्हिडिओमध्ये पहा रेसिपी

भूक लागल्यावर काहीतरी हलकं-फुलकं खायचं असल्यास तुम्ही हे स्प्राउट सॅलेड पटकन तयार करुन खाऊ शकता.

Aishwarya Musale

भूक भागवण्यासाठी अनेकजण समोर जे काही दिसेल ते खातात. जे काही वेळा आपल्यासाठी अनारोग्यकारकही ठरते. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी स्प्राउट सॅलड बनवू शकता. तुम्ही स्प्राउट्स खात असलात तरी, यावेळी तुम्ही येथे सांगितल्याप्रमाणे मूग डाळ स्प्राउट्स सॅलडची ही रेसिपी फॉलो करु शकता.

ते चवदार असण्यासोबतच हाय प्रोटीन देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया हाय प्रोटीन स्प्राउट सॅलड बनवण्याची रेसिपी.

हाय प्रोटीन स्प्राउट सॅलडची ही रेसिपी इन्स्टाग्राम यूजरने (@ohcheatday) त्याच्या अकाउंटवर शेअर केली आहे. जी जीमला जाणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. एवढेच नाही तर अशा लोकांसाठीही ही रेसिपी उत्तम आहे.

जे लोक शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी रेसिपी शोधत आहेत. याशिवाय ही रेसिपी वजन कमी करण्यातही चांगली भूमिका बजावू शकते. चला तर मग जाणून घेऊया हाय प्रोटीन स्प्राउट सॅलडच्या या टेस्टी आणि हेल्दी रेसिपीबद्दल.

स्प्राउट सॅलड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हाय प्रोटीन स्प्राउट्स सॅलड बनवण्यासाठी 1/2 कप अंकुरलेले मूग, 1/4 बारीक चिरलेली शीमला मिरची, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून, 1/2 कप चिरलेली कोथिंबीर, 1/4 कप बारीक चिरलेले ताजे खोबरे घ्या.

1/4 कप पनीर, 1 चमचा बारीक चिरलेले आले, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1/2 कप भाजलेले शेंगदाणे घ्या. नंतर 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, 1/2 टेबलस्पून चिली फ्लेक्स, 1 टेबलस्पून इटालियन मसाला, 1/4 टीस्पून काळी मिरी, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस घ्या.

स्प्राउट सॅलड रेसिपी

स्प्राउट्स सॅलड बनवण्यासाठी संपूर्ण मूग डाळ पाण्यात भिजवून काही तास ठेवा. मग ती भिजली की त्यामधील पाणी काढून धुवून स्वच्छ सुती कापडात बांधून एक दिवस ठेवा.

दुसऱ्या दिवशी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, नारळ, पनीर, आले, हिरवी मिरची आणि शेंगदाणे एकत्र मिक्स करावे. यानंतर ऑलिव्ह ऑईल, चिली फ्लेक्स, इटालियन मसाला, काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा. तुमची भूक भागवण्यासाठी हाय प्रोटीन स्प्राउट्स सॅलड तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

IPL 2026 Qualifier 1 : गुजरात टायटन्सची पराभवामुळ डोकेदुखी वाढली! शुभमन गिल अन् संघाची झोप उडवणारी बातमी...

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तामिळनाडू सरकारने जाहीर केली पीक कर्जमाफी; 14 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा, 'थलपती'नं दिलेलं आश्वासन पाळलं

Bike Mileage Increasing Tips : टू व्हीलर गाडीचं मायलेज कमी आहे? मग आजच करा 'हे' 5 बदल, मायलेज होईल डबल

Latest Marathi News Live Update : ईदनिमित्त बळी देण्याची परवानगी रद्द, वरिष्ठ पोलिसांची माहिती

SCROLL FOR NEXT