Christmas 2023 esakal
फूड

Christmas 2023 : ख्रिसमससाठी बनवा सिंपल आणि टेस्टी बिस्किट केक, एकदम सोपी आहे रेसिपी

ख्रिसमससाठी टेस्टी बिस्किट केक कसा बनवायचा? ते जाणून घेऊयात.

Monika Lonkar –Kumbhar

Christmas 2023 : ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सर्वत्र ख्रिसमसची लगबग पहायला मिळत आहे. सांताक्लॉझच्या टोप्या, बेल्स, ख्रिसमस ट्री आणि सजावटीच्या गोष्टींनी बाजारपेठा सजल्या आहेत.

ख्रिसमसनिमित्त विविध प्रकारचे केक्स, कुकीज, गोड पदार्थ आणि खाद्यपदार्थ बनवले जातात. या पदार्थांची नुसतीच रेलचेल पहायला मिळते. यंदाच्या ख्रिसमसला तुम्ही जर सोपा आणि स्वादिष्ट केक बनवायचा विचार करत असाल तर बिस्किटपासून केक नक्की बनवा.

हा केक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ आणि जास्त साहित्याची गरज पडणार नाही. या केकची रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या बिस्किट केकची रेसिपी.

बिस्किट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • २ कप बिस्किटांचे तुकडे (तुमच्या आवडीचे कोणतेही बिस्किट घ्या. शक्यतो चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट घ्यावे)

  • १ कप दूध

  • १०० ग्रॅम कोको पावडर

  • २ चमचे कॉर्नफ्लोअर

  • अक्रोड (मूठभर)

  • बदाम ४ चमचे

  • चॉकलेट चिप्स (मूठभर)

बिस्किट केक बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी बिस्किटांचे तुकडे मिक्सरला बारीक करून घ्या.

  • हा बारीक झालेला चुरा एका बाऊलमध्ये काढून ठेवा.

  • त्यानंतर, दुधामध्ये कोको पावडर घालून हे मिश्रण गरम करायला ठेवा.

  • त्यानंतर, मिश्रण अधिक घट्ट बनवण्यासाठी त्यात कॉर्नफ्लोअर घाला.

  • जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत ते गरम करा.

  • मिश्रण घट्ट झाल्यावर ते थंड होण्यासाठी काढून ठेवा.

  • आता केक बनवण्याचे भांडे घ्या. त्यामध्ये, आता बिस्किटांचा चुरा घाला. त्यानंतर, कोको पावडरची बनवलेली घट्ट पेस्ट त्यामध्ये घाला.

  • आता त्यावर पुन्हा बिस्किटांचा चुरा घाला आणि त्यावर पुन्हा कोको पावडरच्या पेस्ट घाला.

  • हे लेअर्स लावून झाल्यनंतर त्यात आता सजावटीसाठी अक्रोड, बदाम आणि चॉकलेट चिप्स घाला.

  • यावर तुम्ही तुमच्या आवडीचे चॉकलेट जेम्स, टूटीफ्रूटी देखील घालू शकता.

  • साधारण ३० मिनिटांसाठी हा केक ओव्हनला डिप फ्रिझ करा.

  • आता तुमचा स्वादिष्ट बिस्किट केक तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

MI vs SRH Live: रोहित शर्मा आजचाच नव्हे, तर आणखी काही सामने मुकणार; हार्दिक पांड्याने दिले अपडेट्स, मुंबई इंडियन्सच्या संघात ३ बदल

Cigarette Rate Hike: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा झटका! सिगारेट तब्बल 17% नी महागणार; एका पाकिटामागे किती शुल्क आकारणार?

SCROLL FOR NEXT