Pitla Thalipeeth  file photo
फूड

पिठलं उरलय? करा चविष्ट थालिपीठ!

रात्री केलेलं पिठलं दुसऱ्या दिवशी खायला अनेकांना अवघड जातं

भक्ती सोमण-गोखले

अनेक घरांमध्ये लोकांची आवड-निवड पाहून पदार्थ केले जातात. काहीवेळा एखादा पदार्थ छान झाला की तो पटकन संपतो. तर काही पदार्थ (Food) संपतही नाहीत. पिठलं (Pitla) हा असाच एक प्रकार. पिठलं भाकरी, पोळी, भाताबरोबर अनेक घरात आवडीने खाल्लं जातं. कांदा, लसूण मिरची घालून केलेल्या पिठल्याची चव अवर्णनीयच. पण तोंडी लावणं म्हणून ते कधी रात्री केलंत तर सर्व संपेलच असं नाही. कितीही आवडलं तरी परतद दुसऱ्या दिवशी ते खाल्लं जाईल, याचीही शाश्वती नसते. अशावेळी ते संपण्यासाठी एक गंमत करता येईल. त्याचं थालिपीठ करता येईल. ते कसं हे पाहूया.

साहित्य( Ingredients) - एक मोठी वाडगं पिठलं, ज्वारीचे पीठ ८ मोठे चमचे, तांदळाचे पीठ ५ मोठे चमचे, भरपूर कांदा, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, तिळं, ओवा, हिंग, हळद आणि कोथिंबीर

कृती(Step)- वरील सर्व साहित्य एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालून पीठ छान मळून घ्या. तेलाचा हात लावा. तयार झालेला गोळा १० मिनिंट बाजूला ठेवा. मग तव्यावर तुम्हाला जेवढ्या आकाराचे मोठे किंवा छोटे थालिपीठ हवे असेल तेवढे तव्यावर थापून घ्या. आजूबाजूला थोडे तेल सोडा. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झाल्यावर खायला तयार आहे थालिपीठ. लोणी, सॉस, दही याबरोबर तुम्ही हे थालिपीठ खाऊ शकता.

टीप- अनेक घरांमध्ये मुलांना थालिपीठ आवडतं. पण पीठलं आवडत नाही. अशावेळी जर तुम्ही अशाप्रकारे थालिपीठ करून दिलेत तर मुलेही ती आवडीने खातील. शिवाय पौष्टीक पदार्थही खाल्ला जाईल. त्यात कांदा आवडत नसेल तर तुम्ही कोबीही घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT