Thatte Idli Recipe esakal
फूड

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवा थट्टे इडली, एकदम सोपी आहे रेसिपी

Thatte Idli Recipe : तुम्ही कधी नाश्त्यामध्ये थट्टे इडली खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये दाक्षिणात्य खाद्यपदार्थ खायला सगळ्यांनाच आवडते. खास करून इडली खायला सगळ्यांची पसंती असते. परंतु, तुम्ही कधी नाश्त्यामध्ये थट्टे इडली खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.

थट्टे इडली हा एक उत्तम दाक्षिणात्य पदार्थ आहे. जो सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा सायंकाळच्या नाश्त्यामध्ये हमखास खाल्ला जातो. ही थट्टे इडली झटपट कशी बनवायची त्याची सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात थट्टे इडलीची ही सोपी रेसिपी.

थट्टे इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ कप भिजवलेले तांदूळ

  • १/३ कप भिजवलेले पोहे

  • अर्धा कप दही

  • अर्धा चमचा इनो

  • पाणी

  • चवीनुसार मीठ

  • तूप

थट्टे इडली बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे :

  • झटपट थट्टे इडली बनवण्यासाठी सर्वात आधी भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये घ्या. आता त्यात पोहे आणि दही घाला.

  • यामध्ये आता मीठ आणि पाणी घालून सर्वकाही चांगले बारीक करून घ्या.

  • आता तुमचे थट्टे इडलीचे बॅटर तयार आहे.

  • हे बॅटर जास्त घट्ट असेल तर, तुम्ही यात थोडे जास्त पाणी घालू शकता.

  • आता या थट्टे इडलीच्या बॅटरमध्ये इनो घाला आणि पीठात चांगले मिक्स करा.

  • तुमचे थट्टे इडलीचे बॅटर पूर्णपणे तयार आहे. आता एका भांड्यात बटर पेपर पसरवा. त्यामुळे, इडली सहजपणे काढता येईल.

  • जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर, भांड्याला थोडे तेल लावू शकता. ज्यामुळे, इडली चिकटणार नाही.

  • आता या भांड्यात थट्टे इडलीचे पीठ भरून वाफवायला ठेवा.

  • इडली वाफवण्यासाठी पॅनमध्ये पाणी ठेवा. त्यानंतर, कढईत एका उंच भांड्यावर इडलीची वाटी ठेवा.

  • जेणेकरून पॅनमधील पाणी भांड्यात जाणार नाही आणि वाफेवर इडली शिजली जाईल. वाटी ठेवल्यानंतर, पॅनवर झाकण ठेवा.

  • थोडावेळ शिजल्यानंतर, तुमची थट्टे इडली तयार आहे. आता ही इडली बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवा.  

  • त्यानंतर, या इडलीवर थोड तूप आणि तिखट किंवा पोडी मसाला घालून सर्व्ह करा. सांबर किंवा नारळाच्या चटणीसोबत तुम्ही ही इडली खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT