Tomato  sakal
फूड

Tomato poori recipe: टोमॅटोची चटणी खाऊन कंटाळात, मग ट्राय करा ही लुसलुशीत पुरी! जाणून घ्या रेसिपी

तुम्ही कधी टोमॅटो पुरी खाल्ली आहे का? नसेल तर एकदा नक्की करून बघा.

Aishwarya Musale

अलीकडे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते, मात्र आता बाजारात टोमॅटो स्वस्त होऊ लागला आहे. अशा स्थितीत टोमॅटोचा वापर वाढला आहे कारण त्याशिवाय जेवणाला चव येत नाही.

पण आत्तापर्यंत तुम्ही टोमॅटोचा वापर भाजी, प्युरी किंवा सॅलड इत्यादी बनवण्यासाठी केला असेल. पण तुम्ही कधी टोमॅटो पुरी खाल्ली आहे का? नसेल तर एकदा नक्की करून बघा.

टोमॅटो पुरीची चव खूप चांगली आहे, जी बनवायलाही खूप सोपी आहे. टोमॅटो पुरी तुम्ही बटाटा करी, नॉन व्हेज सोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया टोमॅटो पुरी कशी तयार करता येईल. तुम्ही खाली दिलेला व्हिडिओ पाहून देखील टोमॅटो पुरी करू शकता. हा व्हिडिओ 'अनु'ज किचन मराठी रेसिपीज'ने यूट्यूबवर टाकला आहे.

साहित्य

पीठ - 1 कप

टोमॅटो - २ (प्युरी)

बेसन - १ वाटी

मीठ - चवीनुसार

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

जिरे - अर्धा टीस्पून

हळद पावडर - अर्धा टीस्पून

पाणी - गरजेनुसार

अशी करा टोमॅटो पुरी

  • सगळ्यात पहिलं टोमॅटो कापून, मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून एका भांड्यात ठेवा.

  • आता एका भांड्यात मैदा, बेसन चाळून घ्या आणि त्यात गुठळ्या होऊ नये म्हणून मिक्स करा.

  • नंतर त्यात टोमॅटो प्युरी, मीठ, तूप, लाल मिरच्या, जिरं आणि तेल असे इतर सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करा.

  • आता पिठात पाणी घालून हलक्या हाताने मळून घ्या. नंतर पीठ 20 मिनिटे ठेवा.

  • पीठ चांगले सेट झाल्यावर पिठाचे गोळे करा.

  • आता गोळे गोल पुरीच्या आकारात लाटून बाजूला ठेवा.

  • कढईत तेल टाका आणि मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.

  • आता लाटलेल्या पुर्‍या कढईत एक एक करून चांगल्या तळून घ्या.

  • झाल्यावर सर्व पुर्‍या प्लेटमध्ये काढा. तुमची टोमॅटो पुरी तयार आहे.

  • हे चहा किंवा कॉफी बरोबर सर्व्ह केले जाऊ शकते. तसे ते बटाट्याच्या भाजी सोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT