Uttapam Sandwich Recipe esakal
फूड

Uttapam Sandwich Recipe : नाश्त्याला बनवा उत्तपम सॅंडविच, एकदम सोपी आहे रेसिपी

काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर नाश्त्याला उत्तपमचे सॅंडविच नक्की बनवून पाहा.

Monika Lonkar –Kumbhar

Uttapam Sandwich Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी आणि टेस्टी खायला अनेकांना आवडते. नेहमीचे नाश्त्याचे पदार्थ जसे की, पोहे, उपमा, इडली इत्यादी पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. जर तुम्हाला ही रोज तेच खाऊन बोअर झाले असेल आणि काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर उत्तपमचे सॅंडविच ही रेसिपी नक्की ट्राय करा.

उत्तपम हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. जो सगळ्यांनाच खायला आवडतो. परंतु, तुम्ही कधी उत्तपमचे सॅंडविच खाल्ले आहे का? जर तुम्ही नसेल खाल्ले तर आज आम्ही तुम्हाला त्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

उत्तपम सॅंडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ कांदे

  • २ कप डोसा बॅटर

  • शिमला मिरची २

  • २ टोमॅटो

  • २ चमचे पालकची प्युरी

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • चीज

  • हिरवी चटणी

  • मीठ

उत्तपम सॅंडविच बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका बाऊलमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्रितपणे मिसळा.

  • दुसऱ्या एका भांड्यात डोसा पीठ, पालक प्युरी आणि मीठ घालून एकत्रितपणे मिसळून घ्या.

  • आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवा.

  • त्यानंतर, उत्तपम बनवून त्यावर चिरलेल्या भाज्यांचे मिश्रण पसरवा.

  • त्यानंतर, उत्तपम दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • आता या उत्तपमवर हिरवी चटणी पसरवा, त्यावर हवे असल्यास चीज घाला. तसेच, टोमॅटो सॉस घाला. आता या उत्तपमवर दुसरे उत्तपम झाका.

  • त्यानंतर, हे दोन्ही उत्तपम सॅंडविचप्रमाणे अर्धे कापून गरमागरम सर्व्ह करा. तुमचे सॅंडविच उत्तपम तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

SCROLL FOR NEXT