Vegetable Cutlet Sakal
फूड

Vegetable Cutlets Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा व्हेजिटेबल कटलेट, जाणून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात व्हेजिटेबल कटलेटचा आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

how to make vegetable cutlets at home read recipe

सकाळी नाश्त्यात काय बनवावे असा प्रश्न सर्वंच महिलांना पडतो. तुम्हीही रोज पोहे, उपमा यासारखे पदार्थ खाऊन बोर झाले असाल तर व्हेजिटेबल कटलेट्स बनवू शकता. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे.

व्हेजिटेबल कटलेट्स ही एक उत्तम स्नॅक रेसिपी आहे जी तुम्ही सकाळी नाश्त्यात बनवू शकता. हा पदार्थ कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. एवढेच नाही तर तुम्ही पार्ट्यांमध्ये स्नॅक म्हणूनही सर्व्ह करू शकता. जर तुमचे मूल शाळेच्या पिकनिकला जात असेल तर तुम्ही हे कटलेट बनवून त्याच्या टिफिनमध्ये देऊ शकता.

व्हेजिटेबल कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

फरसबीचे तुकडे

वाटाणे

कांदा

बटाट

गाजराचे तुकडे

अदरक-लसूण पेस्ट

बारिक हिरवी मिरची

गरम मसाला

चाट मसाला

बारिक चिरलेली कोथिंबीर

भाजलेला रवा

तेल

मीठ चवूनुसार

कृती

सर्वात पहिले वरील सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. एखा पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यात जिरं आणि आलं घालावे. हलके ढवळून त्यात बारिक चिरलेल्या भाज्या घालून मंद आचेवर शिजवून घ्या. कोथिंबीर, आमचुर पावडर, मीठ आणि हिरवी मिरची घालून थोडा वेळ ढवळावे. थंड झाल्यावर त्यात बटाटे मिक्स करावे. या मिश्रणापासून गोल किंवा अंडाकृती कटलेट बनवा. कटलेटला मैद्याच्या पाण्यात बुडवावे. नंतर त्यावर ब्रेड क्रंब्समध्ये टाकावे. नंतर गोल्डन ब्राऊन रंगावर तळून कुरकुरीत कटलेट सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT