Mushroom Sandwich sakal
फूड

Mushroom Sandwich: नाश्त्यासाठी झटपट बनवा मशरुम सँडविच, ही आहे सोपी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला एका खास डिशबद्दल सांगणार आहोत. जी खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी देखील असेल.

Aishwarya Musale

जेव्हा नाश्त्याचा विचार केला जातो, तेव्हा सँडविच हा जवळजवळ प्रत्येकाचा आवडता नाश्ता असतो. काहींना साधे व्हेज सँडविच आवडते तर काहींना ते चिकन आणि पनीरसारखे भरपूर फिलिंग असलेले आवडते. तसे, सँडविच खरोखर खूप चांगला आणि पोटभर नाश्ता आहे.

प्रत्येकाला दररोज एकच पदार्थ  खायला आवडत नाही. प्रत्येकवेळी जेवनामध्ये काहीतरी वेगळे असावे, अशी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र, घरातील महिलांना दरवेळी मोठा प्रश्न हाच असतो की, नवीन खाण्यासाठी काय करावे? विशेष म्हणजे लहान मुलांसाठी कारण त्यांना आवडले पण पाहिजे आणि ते हेल्दी देखील असावे.

तर आज आम्ही तुम्हाला एका खास डिशबद्दल सांगणार आहोत. जी खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी देखील असेल घरातील प्रत्येकजण आवडीने खाईल. चला तर मग आजच्या लेखात बघूयात मशरूम सँडविचची खास रेसिपी!

साहित्य:

  • ब्रेड स्लाइड 10-12

  • बटन मशरूम (आवश्यकतेनुसार)

  • एक चमचा लसूण 

  • एक बारीक चिरलेला कांदा

  • एक वाटी बारीक चिरलेली कोबी 

  • एक बारीक चिरलेली शिमला मिरची

  • चार ते पाच मिरच्या

  • दोन चीज क्यूब

  • दोन चमचे टोमॅटो सॉस 

  • काळी मिरी पावडर

  • बटर

  • तेल 3 चमचे

  • मीठ 

कृती:

सर्वप्रथम मशरूम सँडविच बनवण्यासाठी कांदा, लसूण, शिमला मिरची सर्व बारीक चिरुन घ्या.आता एका कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा.तेल गरम झाल्यावर त्यात मशरूम, कांदा आणि लसूण घालून तळून घ्या. सर्व साहित्य 1-2 मिनिटे परतून घेतल्यावर त्यात बारीक चिरलेली कोबी आणि शिमला मिरची घालून शिजवा.

सर्व साहित्य 1-2 मिनिटे भाजल्यानंतर त्यात काळी मिरी, टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.30 सेकंद शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि तयार मसाले एका भांड्यात काढून घ्या.आता ब्रेडचे तुकडे घ्या आणि त्यावर बटर पसरवा. यानंतर तयार मसाला ब्रेडच्या स्लाइसवर चांगला पसरवा.

आता त्यावर चीज किसून घ्या.त्यावर शिमला मिरची आणि मशरूमचे तुकडे ठेवा आणि ब्रेडचे तुकडे बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवा.180 डिग्री सेंटीग्रेडवर 5 मिनिटे बेक केल्यानंतर सँडविच बाहेर काढा.चविष्ट मशरूम सँडविच गरमागरम टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT