egg curry Esakal
फूड

Recipe: ढाबा स्टाईल अंडा करी कशी तयार करायची?

अंड्यातील या बहुगुणांमुळेच ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

दिपाली सुसर

अंड्याच्या लोकप्रियतेमागे अनेक कारणे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारक आहे. प्रामुख्याने यातील कॅल्शिअममुळे हाडांना बळकटी मिळते. यातून व्हिटॅमिन ए, डी. बी-6, बी-12, प्रथिने, लोह आणि क्षार मिळते. बलकातील कोलीन घटक बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरतो. याशिवाय फॉस्फेट, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारख्या पोषणतत्त्वांचा चेतापेशींचे संरक्षण, शरीराची वाढ, तजेलदार त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदा होतो. अंड्यातील या बहुगुणांमुळेच ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. याव्यतिरिक्त घाईच्या वेळी सहज उपलब्ध असलेले आणि कमी वेळात शिजणारे अंडे खूपच कामाला येते.

तंदुरूस्त राहण्यासाठी वर्षातून किमान 180 म्हणजे महिन्याला 15 अंडी ख्यायला हवीत, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नाश्ता, दुपारी किंवा मग रात्रीच्या जेवणात अंड्याचा समावेश असायला हवा.

चला तर मग आज बघू या ढाबा स्टाईल अंडा करी कशी तयार करायची? याची सविस्तर रेसिपी

साहित्य

सहा अंडी

दोन बारीक चिरलेले कांदे

हिरवी मिरची

एक चमचा लसूण अद्रक पेस्ट

दोन टोमॅटोची बारीक पेस्ट

जिरे

गरम मसाल

खसखस खोबर पेस्ट

कोथिंबीर

एक चमचा लाल तिखट

अर्धा चमचा हळद

एक चमचा धणे पावडर

चवीनुसार मिठ

तेल

कृती:

प्रथम अंडी उकडून आणि नंतर मग सोलून घ्यावी अंडे सोलल्यानंतर त्याला मधून थोडे काप पाडुन घ्यावे. जेणेकरून अंडी तळताना तेलात ती फुटणार नाहीत.आता गॅसवर कढई ठेवावी आणि त्यात तेल टाकावे. नंतर मिरची, हळद, मिरपूड आणि मीठ टाका .नंतर अंडी टाकून आणि थोडावेळ अंडी तळून घ्यावी .आता दुसऱ्या कढईत किंवा पॅनमध्ये थोडे तेल टाका आणि गरम झाल्यावर त्यात जिरे आणि शुद्ध गरम मसाला टाका.नंतर त्यात कांदा घालून तपकिरी होईस्तोवर परतून घ्या.नंतर आले, लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, मिरची पूड, टाकून कलसु घ्यावी. नंतर त्यात टोमॅटो पेस्ट, खसखस खोबरा पेस्ट टाकून थोडावेळ हा सगळा मसाला मंद आचेवर मस्त शिजवून घ्यावा. मसाला निट शिजल्यावर त्यात पाणी टाकून ग्रेव्ही बनवून दोन मिनिटे शिजु द्यावी.आता या खमंग तयार मसाल्याच्या ग्रेव्हीत तळलेली अंडी टाकावी आणि हे मिश्रण थोडावेळ शिजु द्यावं. या मिश्रणाला एक उकळी आली की आता त्यात थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर टाकावा आणि पुन्हा एक उकळी येऊ द्यावी. अशा रितीने आपली अंडा करी तयार आहे.
ही अंडाकरी तुम्ही गरम पोळी, नान , भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT