Rajgira Dosa Recipe Esakal
फूड

Rajgira Dosa Recipe: सोमवारच्या उपवासासाठी राजगिऱ्याचा डोसा कसा तयार करायचा ?

उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करुन बघा.

दिपाली सुसर

आज आपण बघणार आहोत राजगिऱ्याच्या पिठाचा डोसा कसा तयार करायचा त्याची रेसिपी..

साहित्य:

1) दोन वाट्या बारीक केलेलं राजगिऱ्याचे पीठ

2) हिरव्या मिरच्या चवीनुसार

3) मीठ

4) एक चमचा जिरे

5) एक उकडलेले रताळे

6) तूप

7) पाणी किंवा ताक तुमच्या आवडीनुसार

कृती:

सुरुवातीला मिरच्या, मीठ आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत.त्यानंतर त्यात उकडलेले रताळे चांगले कुस्करून राजगिऱ्याच्या पीठात एकजीव करुन घ्यावे.नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण घालून पाणी किंवा ताक मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे हे पीठ तयार करावे.तयार झालेले पीठ चांगले एकजीव करुन नॉनस्टिक पॅनवर तूप टाकून खमंग असे डोसे तयार करावेत. हे तयार झालेले स्वादिष्ट डोसे तुम्ही दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खावू शकता.
टीप- राजगिरे पिठ हे घरीच तयार करावे आणि रताळे चांगले शिजवून घ्यावे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि रांका चर्चेत सहभागी; सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा निघणार?

Heart Health Tips by WHO: जगातील 32% मृत्यू हृदयविकारामुळे; WHO चा इशारा, हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा 'या' 5 सवयी

UTU Paper Leak: परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सॲप ग्रुपवर आले प्रश्न; पेपर लीक प्रकरणी असिस्टंट प्रोफेसरला बेड्या!

SCROLL FOR NEXT