Sheera sakal
फूड

Sweet Potato Sheera Recipe: पौष्टिक असणाऱ्या रताळ्याचा शिरा कसा तयार करायचा? जाणून घ्या रेसिपी

रताळी आपण रोज खात नसलो तरी बाजारात ती सहज उपलब्ध असतात.

Aishwarya Musale

रताळी आपण रोज खात नसलो तरी बाजारात ती सहज उपलब्ध असतात. साधारणत: रताळ ही अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांना ज्ञात आहे. पण ब-याच जणांना रताळ्यांचा डायटमध्ये वापर केल्याने होणारे फायदे माहित नाहीत. एकदा रताळ्यांचे शरीराला होणारे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही देखील जरुर याचं रोजच्या रोज सेवन कराल.

कारण यापासून होणारे कित्येक फायदे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. तसेच रताळ्यांची चव एकदा खाल्ली की सतत जीभेवर घुटमळत राहिल अशीच असते. 

रताळेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व अ असते. आपले डोळे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी हे महत्वाचे जीवनसत्व असल्याने आजारपणही जास्त उद्भवत नाही. रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये बिटा केरोटिन हे अँटिऑक्सिडंट असते.

त्यामुळे कॅन्सर तसंच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो. यातील जीवनसत्व क खाणाऱ्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर, पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते. चला तर मग या बहूगुणी पौष्टिक असणाऱ्या रताळ्याचा शिरा कसा तयार करायचा?

साहित्य :

  • दोन वाटी किसलेलं रताळं

  • दोन वाटी दूध

  • दोन चमचे साजूक तूप

  • चवीनुसार साखर

  • वेलची पूड

  • दोन चमचे ताजा खोवलेला नारळ

  • काजू- बदामाचे बारीक काप

  • केशर

कृती :

सर्वप्रथम रताळे स्वच्छ पाण्याने धूवून निट पुसून घ्यावे. नंतर शिलणीने सोलून आणि कसणीवर बारीक किसून घ्यावे. रताळं किसायला जर तुम्हाला वेळ नसेल तर ते रताळं उकडून मग कुस्करून घेतलं तरीही चालेल

तोपर्यंत एका कढईत तूप गरम करायला ठेवावं, तुप गरम झाल की, यात बारीक किसलेलं रताळं घालून नीट परतून घ्यावं.

मिश्रणाचा रंग जरा बदलला की, त्यात दूध घालावं आणि त्याला एक चांगली उकळी येऊ द्यावी.

उकळी आल्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार साखर घालावी.

आता हे मिश्रण नीट ढवळून एकत्र करून घ्यावं.आणि मंद आचेवर दुधात रताळं नीट शिजू दयाव.

रताळं अगदी शिजत आल्यावर मग त्यात खोवलेलं खोबरं, वेलची पूड आणि काजू-बदामाचे बारीक काप आणि केशर घालावेत. त्याला एक हलकीशी वाफ आल्यावर गॅस बंद करावा.

हा रताळ्याचा शिरा कोरडा करण्यापेक्षा जरा ओलसरच करावा. ‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT