How To Store Coffee Powder in monsoon season  
फूड

Kitchen Hacks: पावसामुळं तुमच्याही डब्यातील कॉफी कडक झालीय का? मग वापरा 'या' ट्रिक्स

पावसाळ्यात कॉफी सांभाळून ठेवण्यात गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते.

सकाळ डिजिटल टीम

पावसात गरमगरम वाफाळती कॉफी प्यायला सगळ्यांनाच आवडत. काम करतांना अचानक आळस आला तर मूड रिफ्रेश करण्यासाठी अनेकजण कॉफीला पसंती देतात. मग ती ऑफिसमधील कॉफी असो वा घरातील. पण पावसाळ्यात कॉफी सांभाळून ठेवण्यात गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते. (How To Store Coffee Powder in monsoon season )

पावसाळा सुरु झाला की वातावरणात अनेक बदल पाहायला मिळतात. या वातावरणाचे परिणाम अनेक गोष्टींवर पाहायला मिळतात. मानवाच्या शरिरापासून ते घरातील स्वयंपाक कट्ट्यापर्यंत पावसाचा परिणाम जाणवत असतो. सर्वांना हवाहवासा पाऊस गृहिणींसाठी खुप त्रासदायक ठरतो. कारण पावसामुळं हवेत निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळं स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ खराब होतात. यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या कॉफीदेखील समावेश आहे.

बहुतांश गृहिणी कॉफी खरेदी करताना मोठी बरणी खरेदी करतात. पण सध्याचे वातावरण पाहता हवेतील आद्रतेमुळं बरणीतील कॉफी ओली होऊन तिचे गठ्ठे तयार होतात. अशी कॉफी वापरण्यायोग्य रहात नाही. अशावेळी नक्की काय करावे असा प्रश्न गृहिणींना पडतो. तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत जेणेकरुन तुमची कॉफी खराब होणार नाही.

या ट्रिक्स फॉलो करा

  • कॉफीला ओलाव्यापासून वाचवायचे असेल तर तांदळाचे काही दाणे नॅपकिनमध्ये गुंडाळून डब्यात टाका. यामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होणार नाही.

  • कॉफीमध्ये स्टीलचा चमचा कधीही टाकू नका.

  • कॉफी जेव्हा हवी असेल तेव्हा चमच्याच्या मदतीने काढा. स्टीलच्या चमच्याच्या थंडपणामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होतो.

  • काचेच्या बाटलीत कॉफी पावडर भरून ती फ्रिजमध्ये ठेवावी. यामुळे कॉफी पावडर ओलसर होणार नाही. तसेच बरेच महिनं कॉफी टिकून राहण्यास मदत होते.

  • तसेच कॉफी एअर टाईट बरणीत भरुन ठेवा. त्याला हवा लागणार नाही याची काळजी घ्या.

  • काचेच्या बरणीमध्ये कॉफी भरताना बरणीच्या तळाशी एक टिश्यू पेपर ठेवा.

  • यासोबतच, पावसाळ्याच्या दिवसात कमळाच्या बी चा वापर करू शकतो. असं केल्यामुळे कॉफी खराब होत नाही आणि त्याच्या गुठळ्याही होत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

Karjat ZP Election Result : कर्जतमध्ये आमदार थोरवे यांच्या सुनबाई पराभूत; संपूर्ण निकाल समोर

Pune News : ‘लाडक्या बहिणीं’वर खैरात, मात्र ‘लाडक्या भावां’च्या ताटात खडखडाट! निर्वाह भत्ता मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

SCROLL FOR NEXT