food news garlic ginger paste 
फूड

'ही' ट्रीक वापरली तर ६ महिन्यांपर्यत टिकेल आलं-लसूण पेस्ट

आलं-लसूण पेस्ट दीर्घकाळ टिकवायची असेल तर फॉलो करा 'या' टीप्स

शर्वरी जोशी

कोणत्याही मसालेदार भाजीत एक चमचा आलं-लसूण पेस्ट टाकली की त्या पदार्थाची चव वाढते. त्यामुळे भारतीय स्वयंपाकघरात आलं-लसूण पेस्टला जरा जास्तच महत्त्व आहे. परंतु, ही पेस्ट करायला तसा थोडा जास्तच वेळ लागतो. त्यामुळे घाईगडबडीच्या काळात ही पेस्ट लगेच करणं शक्य नसतं. यावरच उपाय म्हणून अनेक गृहिणी ही पेस्ट सुट्टीच्याच दिवशी करुन ठेवतात व गरजेला वापरतात. परंतु, ही पेस्ट साधारणपणे एका आठवड्याच्यावर टिकत नाही. म्हणूनच, आलं-लसूण पेस्ट तब्बल ६ महिने कशी टिकवावी ते पाहुयात. (how to store ginger garlic paste for long time)

आलं-लसूण पेस्ट टिकवण्यासाठी वापरा 'ही' पद्धत

प्रथम आलं व लसूण धुवून घ्या आणि पंख्याखाली किंवा उन्हात छान कोरडं करुन घ्या. त्यानंतर लसूण व आल्याचं साल काढून मिक्सरमध्ये याची खडबडीत पेस्ट तयार करुन घ्या. या पेस्टमध्ये दोन चमचे मोहरीचं तेल घाला आणि छान फाइन पेस्ट तयार करुन घ्या. पेस्ट झाल्यावर त्यात चिमुटभर मीठ आणि ३-४ चमचे व्हाइट व्हिनेगर घाला. आता ही पेस्ट छान मिक्स करुन एअर टाइट कंटेनर किंवा झिपलॉक बॅगेत भरा व फ्रीजमध्ये ठेऊन द्या. अशा पद्धतीने तयार केलेली पेस्ट ६ महिने आरामात टिकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT