Janmashtami Special  esakal
फूड

Janmashtami Special : जन्माष्टमीला सेवन करूया आरोग्यदायी धनिया पंजिरी, प्रसादाचे आरोग्यदायी फायदे एकदा वाचाच

धनिया पंजिरीमध्ये शुद्ध तूप, मखाना खोबऱ्याच कीस, काजू, बदाम आणि खसखस असते जे आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Janmashtami Special : श्रीकृष्ण जन्म उत्सव संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होतो. श्रीकृष्ण है प्रत्येकाचे लाडके दैवत. यामुळे या लाडक्या कृष्णाची प्रत्येक गोष्ट साऱ्यांना भुरळ पाडणारी, मग प्रसादाचं तर विचारूच नका. जन्माष्टमीला 'धनिया पंजिरी या प्रसादाला विशेष महत्व असते.. गोपाळकाला तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सान्यांनाच प्रिय. हा केवळ प्रसाद नाही तर तो तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. धनिया पंजिरीमध्ये शुद्ध तूप, मखाना खोबऱ्याच कीस, काजू, बदाम आणि खसखस असते जे आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. या धनिया पंजिरीचे विविध फायदे जाणून घेऊया.

यूरीन इन्फेक्शन दूर होते

पंजिरीतील मुख्य घटक असलेल्या जिऱ्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यात फायबर मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फोलेट, बीटा-कैरोटीन आणि अँटीऑक्सिडेट्स देखील असतात हे पचनसंस्थेच्या समस्या आणि यूरीन इनफेक्शन बरे करतात. याव्यतिरिक्त रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.

शक्तीवर्धक तूप

व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास सक्षम असतात. ओमेगा ३ फॅटी अॅसिडच्या उपस्थितीमुळे तूप खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा तूप घेतल्यास यांसारख्या समस्या दूर होतात आणि पचनक्रिया मजबूत होते.

हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करतो मखाणा

प्रथिने, कार्बोहायड्रेट, गुड फॅट, फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम, लोह खनिजे इत्यादी पोषक घटक मखाणामध्ये आढळतात. प्रोटीन असल्यामुळे मखाणा खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल त्यामुळे मखाणा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच चांगल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचे रक्षण होते.

उपयुक्त ड्रायफ्रूट्स

व्हिटॅमिन ई. फायबर आणि प्रथिने समृद्ध बदाम चयापचय गतिमान करतात आणि मेंदू निरोगी ठेवतात. कॉपर, मँगनीज, फॉस्फरस, मॅशियम, जस्त व्हिटॅमिन बी ६, पोटेशियम, लोह मुबलक प्रमाणात असल्याने काजू मुलांसाठी आवश्यक आहेत. (Food)

मनाला मजबूत बनवते खसखस

लोह, कॅल्शियम, ड्रिंक, व्हिटॅमिन बी ६, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, मैशियम, प्रोटीन, फायबर या घटकांमुळे खसखस हे मेंदूला बळकटी देतात. हे त्वचा, हाडांसाठी देखील फायदेशीर आहे आणि रक्तातील साखर नियंत्रित करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT