Janmashtami Special Recipe esakal
फूड

Janmashtami Special Recipe : जन्माष्टमीला पंचामृत या पद्धतीने बनवा, वाचा पंचामृताचे आरोग्यदायी फायदे

पंचामृत योग्य पद्धतीने बनवल्यास तुम्हाला याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील

साक्षी राऊत

Janmashtami Special Recipe : कुठल्याही पूजा विधीमध्ये किंवा विशेष धार्मिक कार्यक्रमात जसे की जन्माष्टमीला पंचामृतचा प्रसाद तयार केला जातो. या प्रसादाची गोड चव प्रत्येकाला आवडते. कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाचा अभिषेक पंचामृताने केला जातो. त्यानंतर हे पंचामृत प्रसाद म्हणून वाटले जाते. तुम्ही पंचामृत योग्य पद्धतीने बनवल्यास तुम्हाला याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. चला तर जाणून घेऊया बनवण्याची योग्य पद्धत.

पंचामृत बनवण्यासाठी काय हवं?

कुठल्याही पूजेत किंवा सणांमध्ये पंचामृत बनवण्याची प्रथा आहे. पंचामृतात पौष्टिक पदार्थ मिसळले जातात. हे बनवण्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर आणि तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.

या योग्य पद्धतीने बनवा पंचामृत

पंचामृत बनवण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या. नंतर त्यात दूध, मध, साखर आणि तूप घाला. आता शेवटी त्यात मखाने घाला. नैवेद्या दाखवण्याआधी त्यात तुलशीची पानं टाका. (Food)

पंचामृताचे आरोग्यदायी फायदे

पंचामृत बनवण्यासाठी दूध आणि दह्याचा वापर केला जातो. हे दोन्ही पदार्थ मेंदूला शांत ठेवण्यास मदत करतात. याशिवाय पंचामृतातील साखर आणि दही गोडव्यासह ताकद देते. आणि तूप आणि तुळशीची पाने आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

Pune Weather: पुण्यात पुन्हा ढगांची दाटी; पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT