Chana Dosa sakal
फूड

Chana Dosa Recipe: काळ्या हरभऱ्यापासून नाश्त्यासाठी बनवा चमचमीत पदार्थ, जाणून घ्या रेसिपी

तुम्ही कधी काळ्या चण्याचा डोसा ट्राय करून पाहिला आहे का?

Aishwarya Musale

डोस्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलेच असेल, गरमागरम डोसा सोबत सांबार आणि चटणी खायची मजाच वेगळी आहे. डोसा ही सहसा सर्व खाद्यप्रेमींची पहिली पसंती असते. जेवणाला रुचकर बनवणारा हा दक्षिण भारतीय पदार्थ थाटात दिसताच भूक कितीतरी पटीने वाढवतो.

डोसा अनेक प्रकारे बनवला जातो, परंतु तुम्ही कधी काळ्या हरभराचा डोसा ट्राय करून पाहिला आहे का? नसल्यास काळा चना डोसा कसा तयार केला जाऊ शकतो ते जाणून घेऊया.

साहित्य

  • काळे हरभरे - १ कप (उकडलेले)

  • तांदूळ - अर्धी वाटी

  • आले - १

  • लसूण पाकळ्या - 10 (चिरलेल्या)

  • हिरवी मिरची - २ चिरून

  • जिरे पावडर- 1 टीस्पून

  • लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

  • पाणी - 1 कप

  • कोथिंबीर - 1 टीस्पून (चिरलेला)

  • पनीर - 1 कप

  • तूप - २ चमचे

असा बनवा काळा चना डोसा

  • काळा चना डोसा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात चणे काढून स्वच्छ करा. नंतर त्यात तांदूळ आणि लसूण घालून बारीक करा.

  • नंतर त्यात हिरवी मिरची, आले आणि थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. आता त्यात लाल तिखट, मीठ, जिरे आणि कोरडी आमचूर पावडर घाला. थोडे पाणी घालून डोस्याचे पीठ तयार करा.

  • आता एका भांड्यात काढा आणि नंतर हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा. नंतर नॉन-स्टिक तव्यावर थोडे तेल लावून गरम करण्यासाठी ठेवा.

  • तवा गरम झाल्यावर मंद आचेवर ठेवा आणि चमच्याच्या मदतीने पीठ पसरवा. चीज घातल्यानंतर डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

  • प्लेटमध्ये काढून गरमागरम डोसा हिरवी चटणी आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT