karwanda lonche esakal
फूड

आंबट गोड चटपटीत करवंदाचे लोणचे एकदा चाखून बघाच

सकाऴ वृत्तसेवा

कच्ची करवंदे चटणी आणि लोणचे बनवण्यासाठी वापरली जातात.

- मीनाक्षी काटकर

पावसाळ्यात करवंदे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. करवंद खायला खूप चविष्ट लागते. करवंदाचे मुरब्बा, करवंदाची चटपटीत चटणी, करवंदाचे लोणचे याची चव खूप चविष्ट लागते. कच्ची करवंदे चटणी आणि लोणचे बनवण्यासाठी वापरली जातात.

साहित्य:

- एक किलो करवंद

- १०० ग्रॕम मोहरीची डाळ

- एक मोठी वाटी साखर

- १०० ग्रॕम मीठ

- २५ ग्रॕम कच्च्या सोपेची पूड

- १०० ग्रॕम सुहाना लोणचे मसाला

- २०० ग्रॕम तेल

- दहा ते पंधरा लसूण पाकळ्या.

कृती: करवंद बत्त्याने ठेचा व हाताने तुकडे करा. त्यात मीठ,साखर घालून दोन दिवस ठेवा. छान रस्सा सुटेल. आता कढईत तेल गरम करा. लसणाच्या पाकळ्या टाकून लाल होऊ द्या. गॅस बंद करा. मोहरीची डाळ तेलावर भाजून घ्या, तेल गार झाल्यावर त्यात मोहरीची डाळ, सोप पावडर, लोणचे मसाला घाला. गार झाल्यावर करवंदात ओता. नीट कालवून बरणीत भरा.

(टीप: करवंद हलक्या हाताने ठेचून तुकडे न करता अख्खेही ठेवता येतील.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT