फायदेशीर लिची स्मूदी
फायदेशीर लिची स्मूदी 
फूड

लिचीने वायरल इंफेक्शनचा धोका होईल कमी, निरोगी हृदयासाठी Litchi Smoothie फायदेशीर

Kirti Wadkar

लिची हे एक असं फळ आहे जे अगदी लहान मुलांपासून मोठे देखील आवडीने खातात. पांढरा गर असलेलं हे रसाळ फळ चवीला गोड असून त्याच्या खास फ्लेव्हरनं Flavorमन तृप्त होतं. चवीला मधुर असलेल्या या फळाचे Fruit आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. Know the benefits of litchi smoothie benefits for body and heart

लिचीमध्ये विटामिन सी, कॉपर, पोटॅशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात. लिची खाणं किंवा लिचीचा ज्यूस पिणं अनेकजण पसंत करतात. मात्र, तुम्ही कधी लिची स्मूदी Litchi Smoothie ट्राय केली आहे का?

लिची स्मूदी चवीला यम्मी लागतेच शिवाय या स्मूदीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती Immunity वाढण्यास मदत होते आणि पचनक्रिया देखील सुधारते.

एवढचं नव्हे तर हृदय निरोगी राहण्यासाठी आणि वायरल इंफेक्शनचा धोका कमी कऱण्यासाठी तसंच डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी लिची स्मूदीचं सेवन फायदेशीर ठरतं. यासाठीच आज आम्ही तुम्हाला लिची स्मूदी कशी बनवावी हे सांगणार आहोत. How To Make Lychee Smoothie

लिची स्मूदीसाठी लागणारं साहित्य

१२-१५ लिची, १ ग्लास थंड दूध, २ मोठे चमचे ग्रीक योगर्ट, मेपल सिरप, बर्फ, शहाळ्याची मलई

लिची स्मूदी तयार करण्याची कृती

सर्वप्रथम लिचीची साल आणि बिया काढून त्याचा गर वेगळा करावा.

त्यानंतर एका ब्लेंडरमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यात लिचीचा गर, शहाळ्याची मलई आणि मेपल सिरप टाकून मिनिटभरासाठी ब्लेंड कराव.

त्यानंतर यात थंड दूध, योगर्ट आणि बर्फ टाकून पुन्हा चांगलं ब्लेंड करावं.

अशाप्रकारे लिची स्मूदी तयार होईल.

हे देखिल वाचा-

आता एका काचेच्या ग्लासमध्ये ही स्मूदी काढून वरून गार्निशिंगसाठी तुम्ही काही लिचीचे बारीक तुकडे टाकून सर्व्ह करू शकता.

लिची स्मूदीचे तुम्हाला वेगवेगळे हटके फ्लेव्हर ट्राय करायचे असतील तर ब्लेंड करताना तुम्ही यात १ केळ किंवा २-३ अननसाचे तुकडे टाकू शकता. या फळांसोबतही लिची स्मूदी चविष्ट लागते. तसंच तुम्ही दूधा ऐवजी, सोया मिल्क किंवा बदामाचं दूध वापरू शकता. वेटलॉससाठी हा चांगला पर्याय आहे.

तसंच तुम्ही मॅन्गो लिची स्मूदी देखील ट्राय करू शकता. यासाठी ब्लेंड करताना अर्धा वाटी आंब्याचा गर टाकावा. लिची आणि आंब्याची स्मूदी तुमच्या घरातील लहानग्यांना नक्कीच आवडेल.

लिची स्मूदीचे फायदे

लिचीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असतं. तसंच यात अत्यंत कमी कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वेटलॉससाठी तुम्ही सोयामिल्क किंवा बदामाचं दूध वापरून लिची स्मूदी तयार करू शकता.

लिचीतील पोषक तत्वांमुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.

तसंच यातील विटामिन सी मुळे त्वचा आणि केस चांगले होण्यास मदत होते.

शिवाय हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि व्हायरल इंफेक्शनचा धोका कमी होण्यासाठी देखील लिची स्मूदीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT