K Pop Diet
K Pop Diet  
फूड

के पॉप आहार घेतल्याने वजन कसं कमी होईल जाणून घ्या!

सकाळ डिजिटल टीम

कोरियन लोकांच्या लाइफस्टाइलने जगाला वेड लावलं आहे. त्यांचे खाद्यपदार्थही खूप लोकप्रिय होत आहेत. चविष्ट असण्याबरोबरच ते अत्यंत आरोग्यदायी, पौष्टिक आणि वजन कमी (Weight loss) करण्यास अत्यंत योग्य आहेत. तर, दुसरीकडे कोरियन (Korian) लोकांच्या के-पॉप आहाराला जगभरात खूप चालना मिळत आहे. वजन जलद गतीने कमी करण्याबरोबच अनेक गोष्टींचा तुम्हाला यात त्याग करावा करावा लागतो. कोरियन आहार (Food) हा समतोल आहे. जोपर्यंत तुम्ही काय खाता याची तुम्हाला जाणीव होत नाही तोपर्यंत तुम्ही किती खात आहात याने काही फरक पडत नाही. के-पॉप आहार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरियन आहाराविषयी अनेकांना उत्सुकता आहे. हा आहार कसा असतो ते जाणून घेण्यासाठी काही मूलभूत गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

fresh vegetables

फळं आणि भाज्यांचा समावेश

कोरियन जेवण हे रंगीत, ताज्या भाज्यांशिवाय अपूर्ण आहे. त्यांच्या भाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यातून ते एक परिपूर्ण आरोग्यदायी पदार्थ तयार करतात. हे पदार्थ योग्य प्रकारच्या कोरियन मसाल्यांनी तयार केलेले असतात. तसेच ते आंबविलेल्या साइड डिशबरोबर खायला दिले जातात.भारतात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा ते प्रकार खूप वेगळे आहेत. तसेच, भाज्यांमध्ये चरबी आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्याने, स्लिम होण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी कोरियन आहार योग्य आहे.

Sea Food

कमी चरबीयुक्त, उच्च प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश

के-पॉप आहारात तळलेले, तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ कमी खाल्ले जाते. उलट प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थ अधिक खाल्ले जातात. कोरियन पाककृतींमध्ये लाल मांस हे मुख्य घटक असले तरी, चिकन आणि सीफूड यातून उत्तम प्रथिनं मिळतात. शिवाय हे घटक वजन कमी करण्यासाठी मदत करतात. कोरियात सर्व प्रकारचे सीफूड उपलब्ध आहे. मासे, ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे अनहेल्दी अन्न खाण्यापासून तुम्ही दूर राहता.

अतिरिक्त साखरेचा समावेश केला जात नाही

के-पॉप किंवा पारंपारिक कोरियन आहारात, कँडी, साखरयुक्त पदार्थ आणि शीतपेये आदी गोड पदार्थ खाण्यास निर्बंध आहेत. अतिरिक्त साखर असलेल्या अन्नात कॅलरीज खूप जास्त असतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वजन वाढू शकते, तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी वाढू शकते.

Korean food

प्रक्रिया केलेल्या अन्न नकोच

कोरियन आहार हा घरगुती जेवण आणि हेल्दी भाज्यांना महत्व देतो. त्यात, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांसाठी अजिबात जागा नाही. कोरियन लोक रेस्टॉरंट्स आणि दुकानांमधील तळलेले पदार्थ, अनहेल्दी फूड खाणे टाळतात. कारण त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.

फरमेंटेशन आहारातील प्रमुख प्रक्रिया

के-पॉप आहार प्रसिद्ध किमचीशिवाय अपूर्ण आहे. आंबलेल्या भाज्या, विशेषत: कोबी, मुळा आणि हिरवा कांदा आणि मीठ, साखर, कांदे, आले, लसूण आणि मिरची यांसारख्या विविध मसाल्यांनी तयार केलेला हा पारंपारिक कोरियन पदार्थ आहे. डिश आंबवलेली असल्याने, त्यात प्रोबायोटिक आढळते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. असे पदार्थ आतड्यांसाठी उत्तम असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय, ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तसेचवजन कमी करण्यासही मदत करतात.

walking

शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे गरजेचे

नियमित शारीरिक व्यायाम केल्याने कोरियन लोकं निरोगी राहतात. सार्वजनिक वाहतूकीऐवजी चालायला ते जास्त महत्व देतात. पुरुष, स्त्रिया, मुले आणि वृद्ध लोक सर्व सक्रिय जीवनशैली जगतात, म्हणूनच कोरियामध्ये जास्त वजन असलेल्या व्यक्ती सापडणे दुर्मिळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT