Coffee
Coffee 
फूड

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : बहानाही ‘काफी’

मधुरा पेठे

आजच्या काळात कॅफेज हा एक मोठा व्यवसाय आहे. ‘स्टारबक्स’, ‘कोस्टा कॉफी’ अशा कॅफेजनी आपलं जाळं जगभर पसरलं आहे. ‘स्टारबक्स’च्या जगभर आठ हजारपेक्षा जास्त शाखा आहेत. सन १९७१ ला सुरू झालेलं स्टारबक्स जगभरात त्यांच्या कॉफीच्या विशिष्ट चवीकरता सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे.

असं म्हणतात, की कॉफी हाऊस प्रथम सुरू झालं ते तुर्कस्तानमध्ये; पण युरोपमध्ये कॉफी पोचायला सतरावं शतक उजाडावं लागलं. युरोपमधलं सर्वांत पहिलं ‘कॅफे द ग्रेट तुर्क कॉफी हाऊस’ लंडनमध्ये सुरू झालं. तिथं कॉफीसोबत चहा, चॉकोलेट आणि तऱ्हेतऱ्हेची सरबतं मिळत. अशा ‘तुर्कीश कॉफी हाऊस’मध्ये कॉफी घेताना लोक गंमत म्हणून तुर्कीश उभी टोपी घालायला लागले. हीच तुर्कीश कॉफी पुढे युरोपिअन संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली.

सुरुवातीची कॉफी हाऊसेस ही मुळात गॉसिप हाऊसेस होती. टवाळक्या करण्याचा अड्डा म्हणजे या जागा. आपल्याकडे जशा पारावरच्या गप्पा चालायच्या, अगदी तशाच शहरभरच्या बातम्या फोडायचं हे ठिकाण. स्टॉक एक्सचेंजचा जन्मही अशा एखाद्या कॅफेमध्ये झाला, असं म्हणतात. त्या काळातल्या व्यावसायिकांचा सतत राबता अशा ठिकाणी असे. त्यातून नवनवीन बिझनेसच्या कल्पना निघत. त्यामुळे हे कॅफे अनेक प्रकारच्या वैचारिक देवाणघेवाणीचं मुख्य केंद्र बनलं होतं. त्या काळात सुसंस्कृत घरातल्या बायका मात्र तिथं पायही ठेवत नसत. गमतीचा भाग असा, की पुढे महिलांनी न्यायालयात या कॉफी हाऊसेसच्या विरोधात याचिका दाखल केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारण त्यांचे पती घरात कमी आणि इथं जास्त वेळ देत. त्या याचिकेमध्ये असं नमूद केलं होतं, की कॉफी पुरुषांच्या पौरुषत्वावर घाला घालत आहे आणि केवळ याचमुळे ब्रिटनचा जन्मदर घसरला आहे. त्यावर प्रत्त्युत्तर म्हणून कॉफी हाऊस मालकांनी कॉफी याच गोष्टीकरता कशी उपयुक्त आहे आणि पुरुषांसाठी कॉफी कसं उत्तम पेय आहे, असा बराच युक्तिवाद केला. 

खूप कॉफी पिणं चांगलं की नाही हा वादाचा मुद्दा आहे; परंतु आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, शहरातल्या गर्दीतून वाट काढत काही घटका स्वतःसाठी काढायच्या असतील, तर कॉफी शॉप्सना पर्याय नाही. एखादी झटपट मीटिंग असो अथवा जुन्या मित्राची निवांत भेट असो- आपली पाऊलं आपोआप कॉफी शॉपकडे वळतात.

जिंजर कॉफी कुकीज 
साहित्य : दोन कप मैदा, तीन-चार कप बटर, पाव टेबलस्पून बेकिंग सोडा, एक टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप साखर, दोन टेबलस्पून इन्स्टंट कॉफी, एक टेबलस्पून कोको पावडर, दोन टेबलस्पून सुंठ पावडर, एक टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, एक टेबलस्पून दूध. 

कृती 

  • वरील सर्व पदार्थ एकत्र करून मळून घ्या.  
  • त्याची पोळी लाटून कुकी कटरने आवडत्या आकारात कापून घ्या. 
  • बेकिंग ट्रेवर बटर पेपरवर कुकीज ठेवा. दोन कुकीजमध्ये आवश्यक अंतर ठेवा, म्हणजे बेक होताना एकमेकांना चिकटणार नाहीत. 
  • ट्रे १० ते १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. 
  • ओव्हन १६० डिग्रीवर ५ मिनिटे गरम करून घ्या. 
  • ट्रे फ्रीजमधून बाहेर काढून ओव्हनमध्ये बेक करायला ठेवा.
  • १५ ते २० मिनिटात कुकीज बेक होतील. तयार झाल्यावर ट्रे बाहेर काढून ठेवा आणि थंड होऊ द्या. थंड झालेल्या कुकीज काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि कॉफीसोबत सर्व्ह करा. या कुकीजमध्ये दालचिनी पावडरसुद्धा वापरू शकतो, किंवा कोको पावडर अधिक प्रमाणात घेऊन चॉकलेट कॉफी कुकीज तयार करू शकतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT