Perfect TilGul Recipe : नवीन वर्षातला पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत. ''तिळगुळ घ्या गोड गोड बोला'' म्हणत आपण जवळच्यांना, मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना तिळगुळ देतो आणि नात्यातला गोडवा जपून राहावा अशा शुभेच्छा सुद्धा देतो. संक्रांतीला तीळ गुळाच्या लाडवाचं विशेष महत्व आहे. याकाळात तिळगुळाच्या लाडूची व्हरायटी खायला मिळते. काही जण तीळ साखरेचाही लाडू किंवा वडी बनवतात.
तिळाचे लाडू खायला स्वादीष्ट तितकेच पौष्टीक असतात. बऱ्याचदा आपण जेव्हा घरी लाडवांचा बेत आखतो तेव्हा ते कधी जास्तच कडक होऊन जातात तर कधी अगदी भुसभुशीत होतात. लाडू करताना पाक व्यवस्थित झाला नाही तर लाडू कडक बनतात. अर्ध्या तासात तिळाचे परफेक्ट लाडू कसे बनवायचे, जाणून घेऊया.
तिळाचे लाडू कसे बनवायचे
गॅसवर एक पॅन ठेवा, तो व्यवस्थित गरम होऊ द्या. आता त्यात तीळ घाला आणि ते छान खरपूस भाजून घ्या.
भाजलेले तीळ बाजूला काढून घ्या. आता पॅनमध्ये थोडंसं पाणी घाला, आणि त्यात गूळ घालून तो मंद आचेवर वितळेपर्यंत शिजवून घ्या.
गूळ व्यवस्थित वितळल्यावर त्यात तीळ, गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या.
मिश्रण थोडं गार झाल्यावर लाडू वळून घ्या.
लाडू वळताना एक लक्षात ठेवा हाताला थोडं तेल लावा, हाताला चटका लागणार नाही याकडे लक्ष द्या.
यात तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे घालू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.